आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत द्वेषातून हल्ले अर्थात हेट क्राईमचा नवा ट्रेंड दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये दक्षिण आशियाई विशेषतः हिंदू महिलांवर हल्ले होत आहेत. त्यांची लूटमार वाढली आहे. फक्त कॅलिफोर्नियामध्ये या वर्षात आतापर्यंत २५ हून अधिक हिंदू महिलांवर हल्ले झाले. ज्यांच्यावर हल्ला झाला त्या साडी नेसलेल्या वा टिकली लावलेल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी या प्रकारच्या गुन्ह्याचे वर्गीकरण हेट क्राइम म्हणून केले आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, पोलिसांनी भारतीय महिलांना सोन्याची चेन आणि पर्स न घेता घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. शक्य असल्यास मोठ्याऐवजी छोटी पर्स सोबत ठेवण्यास सुचविले अाहे. कॅलिफोर्निया पोलिसांच्या प्रवक्त्याने भास्करला सांगितले की, दरोडेखोर जाणीवपूर्वक साडी-टिकली घातलेल्या महिलांना लक्ष्य करत होते.
भारतीय वंशाच्या महिलांनी चांगली वेशभूषा करणे केले बंद अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलांनी सार्वजनिक ठिकाणी चांगली वेशभूषा करणे जवळपास बंद केल्याचे सांगितले जात आहे. त्या आता फक्त खासगी कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्ये दागिने घालत आहेत. अंगावरील मौल्यवान दागिन्यांसाठीही महिलांना लक्ष्य केले जाते. दरोडेखोर दागिने वितळवत असल्यामुळे ते पकडले जाण्याची शक्यता कमी होते. हल्ले आणि लुटमारीच्या बहुतांश घटना बाजारपेठ आणि निवासी भागात अधिक घडत आहेत.
पाेलिस म्हणाले... बहुतांश घटना रस्ता ओलांडताना वा बसची वाट पाहत असताना कॅलिफोर्नियाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जेफ रोजेन म्हणाले की, हेट क्राइमच्या गुन्ह्यांमुळे प्रभावित भारतीय महिलांमध्ये भीती कायम आहे. महिलांवर हल्ला झाला तेव्हा त्या रस्ता ओलांडत होत्या किंवा किराणा दुकानावर किंवा बस-ट्रेनची वाट पाहत होत्या. या सर्व घटनांचे विश्लेषण केले असता असे आढळून आले की हल्ला झालेल्या सर्व महिलांनी बिंदी लावलेली केली होती आणि सर्व जणी दक्षिण आशियातील आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.