आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:कोरोना काळात चीनच्या लोकांवरील हल्ले दहापट वाढले, हल्ले रोखण्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काढले आदेश

न्यूयॉर्क / मोहंमद अलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी चीन वंशाच्या लोकांवर हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हे हल्ले कोरोना काळात वाढले आहेत. तज्ञांनुसार हे हल्ले वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पद्वारा कोरोना पसरवण्यास चीनला जबाबदार धरणे आहे. मे २०२० पासूनच अमेरिकेने चीनवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे. यामुळे अमेरिकेच्या नागरिकांत चीनच्या लोकांबाबत द्वेष निर्माण झाला आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ लागले. एकट्या न्यूयॉर्कमध्ये २०१९ मध्ये चिनी वंशाच्या लोकांच्या द्वेषातून हिंसाचाराच्या तीन घटना झाल्या होत्या. २०२० च्या अखेरपर्यंत अशा गुन्ह्यांची संख्या २९ झाली. म्हणजे न्यूयॉर्कमध्ये हल्ले दहापट वाढले. आकडेवारीनुसार पूर्ण अमेरिकेत चीनच्या लोकांसोबत गुन्हे वाढले आहेत.

असे हल्ले रोखण्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काढले आदेश
राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाइट हाउसने चिनी लोकांसोबत हिंसेची दखल घेऊन एक कार्यकारी आदेश जारी केला आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, असे हल्ले कोणत्याही स्थिती स्वीकारता येणार नाहीत. आरोग्य विभागाला सांगण्यात आले आहे की, महामारीवर बोलताना त्यांनी विशेष लोकांबाबत बोलू नये.

नऊ महिन्यांत ३००० घटना, हल्ल्याची धग सिलकॉन व्हॅलीपर्यंत
आशियाई प्रशांत नीती- योजना परिषदेने गुन्ह्यांविरोधात माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत NYC.Gov/StopAsianHate नाावाचे वेबपेज काढले. परिषदेनुसार मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे वांशिक गुन्ह्याचे ३००० पेक्षा प्रकरणे नोंदवली गेली. यात एक चतुर्थांशपेक्षा जास्त बे एरियात झाले. टेक सिटी सिलिकॉन व्हॅलीतही चिनी लोकांवरील हल्ले वाढले आहेत.

हल्ल्यांविरोधात रॅली, आंदोलक म्हणाले- ९/११ नंतरच्या स्थितीच्या आठवणी ताज्या झाल्या
हल्ल्यांविरोधात शनिवारी न्यूयॉर्कमध्ये एक भव्य रॅली काढण्यात आली होती, तर न्यूयॉर्कमध्ये एशियन अमेरिकन कम्युनिटीच्या सदस्य लूसी चिंग यांनी सांगितले की, या शहरात स्थलांतरितांविरोधात असा हिंसाचार पाहिला नव्हता. हे हल्ले ९/११ अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीची आठवण करून देतात. न्यूयॉर्क सिटीचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी सांगितले की, असे हल्ले अन्यायकारक आहेत. हल्ले रोखण्यासाठी पुढील आठवड्यात महापौरांसाेबत बैठक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...