आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅनडात भारतवंशीय लोकांवरील वाढत्या प्राणघातक हल्ल्यांमुळे भारतवंशीय समुदायात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यात हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. हल्लेखोरांच्या निशाण्यावर भारतवंशीय आहेत की हल्ले वंशभेदातून होत आहेत, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. परंतु मोठ्या संख्येने स्थलांतरित भारतवंशीय तरुण उदरनिर्वाहासाठी तेथे पार्ट टाइम नोकरी करतात. त्यामुळे चिंता वाढली आहे. कारण बहुतांश तरुणांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यांच्यावर हल्ल्याची भीती व्यक्त होते. याच महिन्यात अल्बर्टामध्ये सनराज सिंह (२४) यांची हत्या झाली. डिसेंबरमध्येही आेंटारियोच्या मिसिसॉगाचे रहिवासी पवनप्रीत कौर (२१) यांची गोळी मारून हत्या झाली होती. नोव्हेंबरमध्ये ब्रिटिश कोलंबियात महकप्रीत सेठीची (१८) सुरीने हत्या झाली होती. साऊथ एशियन हेरिटेज असोसिएशन ऑफ हॅमिल्टन अँड रिजनचे अध्यक्ष खुर्शीद अहमद म्हणाले, सेवा क्षेत्रात भारतवंशीयांची संख्या जास्त आहे. अनेकदा त्यांना उशिरा रात्रीपर्यंत घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे त्यांची हिंसेची जोखीम वाढते.
ग्रेटर टोरंटो भागातील स्कारबरो येथील रहिवासी व डिलिव्हरी क्षेत्रातील युवराज मोंगिया म्हणाले, गॅस स्टेशन तसेच मोठ्या दुकानांच्या ठिकाणी रात्रपाळीत केवळ एक व्यक्ती कामावर असते. त्यामुळे जोखीम वाढते. महकप्रीतसोबत खूप वाईट झाले. आम्ही येथे चांगले करिअर, निश्चित निवास, सुरक्षित जीवन याची आशा घेऊन येतो. परंतु आम्ही सुरक्षित राहिलो नाही तर बाकी गोष्टींना अर्थ नाही. हल्ल्याच्या घटना वंशभेदातून झाल्यासारखे वाटत नाही.
स्थलांतरितांमध्ये प्रत्येकी पाचपैकी एक भारतीय कॅनडात भारतवंशीयांचे प्रमाण एकूण लोकसंख्येत १८.५ लाख एवढे आहे. एकूण लोकसंख्येत ते ५ टक्के आहे. त्याव्यतिरिक्त कॅनडाच्या विद्यापीठांत २.३ लाखांहून जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी बहुतांश खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम नोकऱ्याही करतात. अलीकडे भारतवंशीयांसाठी शिक्षण, नोकऱ्या व स्थायी निवासासाठी आवडते ठिकाण म्हणून कॅनडाचा उदय झाला. स्टॅटिस्टिक्स कॅनडाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत कॅनडात स्थलांतरित झालेल्यांमध्ये प्रत्येकी पाचपैकी एक भारतवंशीय आहे.
घरांच्या किमतीत वाढ, परदेशींच्या संपत्ती खरेदीला मनाई कॅनडात सरकारने घरांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे परदेशींना रहिवासी मालमत्ता खरेदीस मनाई केली आहे. कोविडनंतर कॅनडात रिअल इस्टेटच्या दरांत वाढ झाली आहे. गुंतवणुकीसाठी परदेशी लोक मालमत्ता खरेदी करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.