आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत वर्णभेदाविरोधात आंदोलन सुरू आहे. सोमवारी रात्री आंदोलकांनी व्हाइट हाऊसजवळ लाफेट पार्कमध्ये मोठा गदारोळ घातला. त्यांनी ट्रम्प यांचे आवडते राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॅक्सन यांचा घोड्यावरील पुतळा दोरी आणि साखळ्या बांधून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांचा प्रयत्न फसला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. आंदोलकांनी पार्कच्या एका भागाचा उल्लेख ब्लॅक हाऊस झोन म्हणून केला. चर्चच्या भिंतीवर घोषणा लिहिल्या. तसेच, ट्रम्प व जॅक्सन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी पार्कबाहेर जाळपोळही करण्यात आली. पुतळा पाडणाऱ्यांना १० वर्षे कारागृहात पाठवण्याची मागणी ट्रम्प यांनी केली.
एक डझन पुतळे तोडले
व्हाइट हाऊसमध्ये १ जूनला देखील ब्लॅक लाइव्हज मॅटरअंतर्गत आंदोलन झाले होते. तेव्हा स्थिती एवढी बिघडली होती की, ट्रम्प यांना बंकरमध्ये लपावे लागले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.