आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅशिंग्टन:विविध आजार टाळण्यासाठी डासांच्या जीनमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डासांपासून सुरक्षेसाठी अनेक प्रकारचे उपाय आहेत. डासांना पळवण्यासाठी अगरबत्तीचा वापर केला जाताे. काही लाेक इतर साधनांचा वापर करतात. मात्र आता संशाेधक डासांना माणूस दिसणार नाही यावर काम करत आहेत. हा प्रयाेग यशस्वी ठरल्यास डासांचे माणसावरील हल्ले कमी हाेतील. अमेरिकन नियतकालिक करंट बायाेलाॅजीमध्ये प्रकाशित एका प्रबंधात ही माहिती देण्यात आली.

कॅलिफाेर्नियातील संशाेधकांनी हा प्रबंध तयार केला आहे. संशाेधकांनी डासांच्या विराेधात जीन-एडिटिंग टूल ‘क्रिस्प-कॅस-९’ चा वापर केला. त्याद्वारे डास पाहू शकतात, अशा संकेतामध्ये अडथळा निर्माण झाला. संशाेधकांनी डासांच्या दाेन लाइट सेन्सिंग रिसेप्टर्सला संपुष्टात आणले. डास हल्ला करण्यासाठी काळ्या दृश्य संकेतांचा वापर करतात. कॅलिफाेर्निया विद्यापीठात पाेस्टडाॅक्टरल नेहा ठाकरे म्हणाल्या, डासांच्या दृष्टीला नियंत्रित करण्यासाठी एका महत्त्वाच्या संशाेधनाची ही चांगली सुरुवात आहे. अध्ययन करणाऱ्या टीममध्ये नेहा यांचा सहभाग नाही, परंतु क्रिस्प तंत्रज्ञानाचा त्या अभ्यास करतात. संशाेधकांनी अभ्यासासाठी एडिस इजिप्ती डासांची निवड केली. या प्रकारातील मादी डास दरवर्षी लाखाे लाेकांना बाधित करते. त्यातून डेंग्यू, ज्वरामुळे लाेक आजारी पडतात. एनाफिलिज डास रात्री शिकार करतात. ते मलेरियाचा फैलाव करतात. डेंग्यूचे डास एडिस इजिप्ती सूर्यप्रकाश व सायंकाळी शिकार करतात. कॅलिफाेर्निया विद्यापीठाचे न्यूराेबायाेलाॅजिस्ट क्रॅग माँटेल म्हणाले, डास त्वचेच्या काही कार्बनिक संकेतांच्या साहाय्याने मानवाला आेळखू शकतात. तापमान, आर्द्रता, वास इत्यादी. परंतु त्यांना काही आढळून आले नाही तर ते थेट जवळील गाेष्टींवर लक्ष्य करतात.

बातम्या आणखी आहेत...