आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडिओ लीक प्रकरण:पृथ्वीवरील सर्वात खाेटारडा माणूस म्हणजे इम्रान : शाहबाज

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जगातील सर्वात खाेटारडा माणूस असे संबाेधले आहे. एका मुलाखतीत शाहबाज म्हणाले, २०१८ पासून सत्तेवर असलेल्या इम्रान यांनी देशांतर्गत तसेच परदेशी प्रकरणात देखील देशाचे माेठे नुकसान केले आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज म्हणाले, इम्रान देशाची कामे वैयक्तिक अजेंड्यानुसार चालवत हाेते. देशाच्या इतिहासात सर्वात अनुभवहीन, आत्मकेंद्री, अहंकारी, अपरिपक्व नेता म्हणून ते ओळखले जातात. लीक झालेला ऑडियाे म्हणजे ते (इम्रान) जगातील सर्वात खाेटारडे व्यक्ती असल्याचा पुरावा म्हटला पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी असा खाेटारडेपणा केल्याने देशाची प्रतिमा मलिन झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...