आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाच्या नोटेवरून राणी एलिझाबेथ यांचा फोटो हटणार:100 वर्ष जुनी परंपरा खंडित, ब्रिटनच्या किंग चार्ल्सऐवजी आपल्या नेत्याला देणार स्थान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आता आपल्या देशाच्या चलनातून ब्रिटीश राजेशाहीची छायाचित्रे काढून टाकणार आहे. ऑस्ट्रेलियातील सेंट्रल बँकेने गुरुवारी ही घोषणा केली आहे. महाराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर त्यांचा फोटो $5 च्या नोटेवरून काढून त्याजागी किंग चार्ल्स यांचा फोटो लावायचा होता. मात्र, आता असे होणार नाही, असे बँकेने सांगितले.

वास्तविक ऑस्ट्रेलियामध्ये घटनात्मक राजेशाहीची व्यवस्था आहे. ज्या अंतर्गत ब्रिटनचा राजा किंवा राणी त्यांच्या संसदेचा प्रमुख आहे. त्यामुळे तिथल्या बँकांच्या नोटांवरही त्यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. 100 वर्षांनंतर आता ही परंपरा खंडित होणार आहे.

हा फोटो आहे राणी एलिझाबेथच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा. जेव्हा त्या पती प्रिन्स फिलिपसोबत पोहचल्या होत्या.
हा फोटो आहे राणी एलिझाबेथच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा. जेव्हा त्या पती प्रिन्स फिलिपसोबत पोहचल्या होत्या.

ब्रिटनच्या महाराजांऐवजी आमच्या नेत्याला स्थान
किंग चार्ल्सच्या यांच्या फोटोऐवजी आता ऑस्ट्रेलियातील मोठ्या स्थानिक समुदायाच्या नेत्याचा फोटो बँकेच्या नोटेवर छापण्यात येणार आहे. यासाठी बँकेने सूचनाही मागवल्या आहेत. नव्या रचनेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाची संस्कृती आणि इतिहासाला आदरांजली वाहण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सरकारशी चर्चा केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये मूळ समुदायाचे लोक घटनात्मक राजेशाहीच्या विरोधात आंदोलन करत आले आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये मूळ समुदायाचे लोक घटनात्मक राजेशाहीच्या विरोधात आंदोलन करत आले आहेत.

निर्णयाचे कौतुक
बँकेच्या नोटांवर राजा चार्ल्स यांचा फोटो न छापण्याच्या निर्णयाचे तेथील स्थानिक समुदायाने स्वागत केले आहे. ऑस्ट्रेलियाला आता ब्रिटनच्या प्रभावातून बाहेर पडावे लागेल, असे त्यांचे मत आहे. गेल्या 65 हजार वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मूळ समाजाला महत्त्व दिले पाहिजे.

ऑस्ट्रेलियात घटनात्मक राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी 1999 ला सार्वमत घेण्यात आले. तेव्हाचा हा फोटो आहे.
ऑस्ट्रेलियात घटनात्मक राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी 1999 ला सार्वमत घेण्यात आले. तेव्हाचा हा फोटो आहे.

राजेशाहीबद्दल लोकांची ओढ कमी
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा ब्रिटनच्या राजाला आपल्या देशाचा घटनात्मक प्रमुख मानण्यावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत अँथनी अल्बानीज यांच्या सरकारवरही निवडणुका घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. तथापि, 1999 मध्ये एक सार्वमतही झाले. ज्यामध्ये संवैधानिक राजेशाहीला पाठिंबा देणारी बाजू फार कमी मतांनी जिंकली गेली होती. अलजझीराच्या वृत्तानुसार, आता परिस्थिती बदलली आहे. ब्रिटीश राजेशाहीशी लोकांची ओढ कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...