आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आणि जपानपासून ते आफ्रिकेच्या सागरी भागापर्यंत अनेक देश ड्रॅगनच्या कारवायांमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनी म्हटले आहे की, चीन आपल्या देशाची हेरगिरी करत आहे. ते म्हणाले- चीनचे एक निरिक्षण जहाज ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीवर गेल्या एक आठवड्यापासून लक्ष ठेवून आहे.
स्कॉट मॉरिसन चीनच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत
डटन म्हणाले की, लष्करी आणि गुप्तचर तळांजवळ चिनी हेरगिरीचे जहाज दिसले. 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी त्यांचे हे वक्तव्य आले आहे. खरेतर, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन सार्वजनिक सभांमध्ये सुरक्षेचा मुद्दा बनवून चीनविरोधात वातावरण निर्माण करत आहेत. मॉरिसनच्या लिबरल पक्षाचा आरोप आहे की, चीन मुख्य विरोधी पक्ष लेबर पार्टीला आर्थिक मदत देत आहे. ऑस्ट्रेलियाचे चीनशी असलेले संबंध हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे.
चिनी गुप्तहेर जहाज आधीही दिसले
2019 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लष्करी ऑपरेशनवर देखरेख करण्यासाठी असेच एक चिनी जहाज आले होते. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारावर पाळत ठेवणे आता खुप होऊ लागले आहे. विशेषत: आशिया-पॅसिफिक आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशांमध्ये अशा प्रकारच्या लष्करी हेरगिरीत लक्षणीय वाढ झाली आहे, कारण या प्रदेशांमध्ये रणनीतिक शत्रुत्व वाढत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.