आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँडमध्ये सोमवारी हवेत दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेलिकॉप्टरची टक्कर झाल्यानंतर एक हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले तर दुसरे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. मरीन थीम पार्कजवळ ही घटना घडली. जेव्हा ही घटना झाली. तेव्हा पार्कमध्ये अनेक लोक होते. ABC न्यूजनुसार, हेलिकॉप्टरवर थीम पार्कचा लोगो लावलेला होता.
अमेरिकेत एअर शो दरम्यान दोन विमानांची धडक
अमेरिकेतील डलासमध्ये एअर शो दरम्यान दुसऱ्या महायुद्धातील दोन विमानांची जोरदार धडक झाली. त्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पसरले. दोन्ही विमानांमधील 6 जणांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत हवाई दलाने स्पष्ट केले आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. तर विमान कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
हेलिकॉप्टर दुर्घटनेचे सत्य
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर कोसळले. त्यात 14 जण होते. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचा समावेश होता. ज्या भागात हा अपघात झाला तेथे धुके पसरले होते. या अपघाताचे सर्वात मोठे कारण हवामान असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही पुढे आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर वेगाने झाडांवर आदळले. त्यानंतर आग लागली. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचं म्हणणे आहे की, त्यांनी जळणाऱ्या लोकांना बाहेर पडताना पाहिले. येथे वाचा संपुर्ण बातमी.
विमान-पक्ष्यांची टक्कर
19 जून 2022 रोजी तीन विमानांना देशात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पहिले - पाटणा, दुसरे - दिल्ली आणि तिसरे गुवाहाटीमध्ये. यापैकी पाटणा आणि गुवाहाटी मधील विमानांना बर्ड हिटमुळे पुन्हा उतरावे लागले. उडत्या विमानाला पक्षी धडकल्यास त्याला बर्ड हिट म्हणतात. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या विमानाला एका छोट्या पक्ष्याने धडक दिल्याने विमानाचे असे किती नुकसान होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होतो. चला, तर मग जाणून घ्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये या प्रश्नाचे उत्तर....येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.