आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Australia's Ellis Spring Airport : Due To The Inclement Weather, The Aircraft Does Not Rust, So It Is A Preferred Place For Long term 'parking'.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाचे एलिस स्प्रिंग विमानतळ...:अति काेरड्या हवामानामुळे येथे विमानांना गंज लागत नाही, त्यामुळेच दीर्घकाळ ‘पार्किंग’साठी पसंतीचे ठिकाण

अमित चौधरी | एलिस स्प्रिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : टेड जेंग - Divya Marathi
फोटो : टेड जेंग
  • आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने एलिस स्प्रिंग विमानतळावर विमानांची गर्दी

काेराेनाकाळात आंतरराष्ट्रीय उड्डाणे जवळपास बंद आहेत. अशा वेळी देशांना जवळ आणणारी ही अवाढव्य विमाने अखेर गेली कुठे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकताे. अशा आंतरराष्ट्रीय विमानांच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक ऑस्ट्रेलियाचे एलिस स्प्रिंग आम्ही तुम्हाला दाखवत आहाेत. उत्तर प्रांतातील अवघी २६ हजार लाेकसंख्या असलेले हे शहर एशिया पॅसिफिक एअरक्राफ्ट स्टाेअरेज सुविधेसाठी आेळखले जाते. एलिस स्प्रिंग विमातळाशी संबंधित ही सुविधा आधीपासून विमान कंपन्यांना आपली विमाने दीर्घकाळ उभी ठेवण्यासाठी पसंतीचे ठिकाण आहे. काेराेनाकाळात कंपन्यांना नाइलाजाने विमाने उभी ठेवावी लागत आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढत आहे. आताही येथे दीडशेपेक्षा जास्त विमाने दीर्घकाळापासून उभी आहेत. व्यवस्थापकीय संचालक टाॅम विन्सेंटनुसार आता क्षमता वाढवण्यात येत आहे. एअरक्राफ्ट इंजिनिअर्स व ग्राउंड स्टाफही वाढत आहे.

एलिस स्प्रिंगच का : विमाने दीर्घकाळ उभी करायची म्हटली तरी देखभालीची गरज भासतेच. आशियाई देशांतील वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे गंज लागण्याचा धाेका वाढताे. एलिस स्प्रिंगला ऑस्ट्रेलियातल्या ‘रेड सेंटर’ वाळवंटाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. येथील हवामान अतिशय काेरडे असते. त्यामुळे गंज लागण्याचा धाेका कमी असताे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser