आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटनला तिसऱ्या लाटेचा धाेका असल्याने अनलाॅक टाळा, तज्ज्ञांचे जाॅन्सन सरकारला आवाहन

लंडन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या संकटासाठी तयार राहा : अमेरिकी तज्ज्ञ

ब्रिटनमध्ये सरकारने २१ जूनपासून टाळेबंदी उठवण्याची याेजना आखली आहे. त्याची तयारीही सुरू आहे. परंतु संसर्गाबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. व्हेरिएंट बी.१.६१७.२ चा संसर्ग संपूर्ण इंग्लंडमध्ये दिसून येत आहे. यातून रुग्णसंख्येत वाढ हाेण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात आढळलेल्या प्रतिरूपाप्रमाणेच याकडे पाहिले जाते. कारण याचा वेगाने प्रादुर्भाव हाेताे. त्यातही लसीचा पहिला डाेस घेतलेल्यांमध्ये हा धाेका असल्याने तज्ज्ञांनी पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांच्या सरकारला काेराेनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा दिला आहे. त्याशिवाय २१ जून राेजी देशाला अनलाॅक करण्याची याेजनादेखील ३-४ आठवडे पुढे ढकलावी, असे आवाहनदेखील तज्ज्ञांनी केले आहे. ब्रिटिश मेडिकल असाेसिएशनने पंतप्रधानांना आकड्यांचे विश्लेषण करून हा इशारा दिला आहे. लसीकरण झाले असले तरी नव्या प्रतिरूपामुळे झालेल्या संसर्गाने रुग्णालयात दाखल हाेणारे लाेक व मृतांची संख्या वाढू शकते. म्हणूनच सरकारने अनलाॅकच्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काेराेनाचा उगम शाेधला नाही तर जगाला काेविड-२६ व काेविड-३२ यासाठी तयार राहावे लागणार आहे. यूएसएफडीएचे संचालक स्काॅट गाेटलिब म्हणाले, चीनच्या वुहान प्रयाेगशाळेतून विषाणूचा उगम झाला. या गृहीतकाला आधार देणाऱ्या तथ्यांचे समर्थन करावे अशी स्थिती नाही. टेक्सास चिल्ड्रन हाॅस्पिटल सेंटर फाॅर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर हाेटेज यांनी एका टीव्ही मुलाखतीत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, महामारीबद्दलच्या उगमाची माहिती नसणे ही बाब जगाला भविष्यातील महामारीच्या संकटात ढकलू शकते. म्हणूनच माहिती नाही ताेपर्यंत काेविड-२६, काेविड-३२ सारख्या संकटांना नाकारता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...