आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक चमत्कार:1 बाळ अन् 3 डीएनए...जगातील पहिल्या 'सुपर बेबी'चा झाला जन्म; कोणताही अनुवांशिक आजार होणार नाही

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर जगात पहिल्या 'सुपरकिड'चा जन्म झाला आहे. या बाळाकडे सुपर पॉवर आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा अनुवांशिक आजार होणार नाही किंवा कोणत्याही जेनेटिक म्यूटेशनमुळे त्याचे कोणते नुकसानही होणार नाही. कारण, या बाळाच्या शरीरात केवळ त्याच्या आई-वडिलांचाच नव्हे तर एका तिसऱ्या व्यक्तीचा डीएनएही जोडण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये हे अनोखे बाळ जन्मले आहे.

हे बाळ जन्मास घालण्यासाठी 3 जणांच्या डीएनएचा वापर करण्यात आला. डीएनएचे वैशिष्ट्य अबाधित राखण्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या बालकाला उपचार न करता येणारा कोणताही अनुवांशिक आजार होणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.

हे मूल जन्मास घालण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर करण्यात आला मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट (MDT) असे म्हणतात. या बाळाला जन्म देण्यासाठी निरोगी महिलेच्या अंड्यातून टिश्यू घेऊन आयव्हीएफ भ्रूण तयार करण्यात आले. हा गर्भ ज्या महिलेच्या उदरात वाढला, त्या महिलेच्या अनुवांशिक आजारांपासून तो सुरक्षित आहे. म्हणजे त्याच्यावर त्याच्या आईला होणाऱ्या आजारांचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच त्याला स्वतःलाही असा कोणता आजार होणार नाही.

3 पालकांचे बाळ

या भ्रूणामध्ये जैविक पालकांचे शुक्राणू व अंडी यांचे मायटोकॉन्ड्रिया मिसळण्यात आला आहे. मायटोकॉन्ड्रिया हे कोणत्याही पेशीचे पॉवर हाउस असतो. या मुलाच्या शरीरात पालकांच्या डीएनएसह तिसऱ्या महिला दात्याच्या अनुवांशिक सामग्रीतून (जेनेटिक मटेरिअल) 37 जनुकांचा समावेश आहे. म्हणजेच हे मूल प्रत्यक्षात 3 पालकांचे बाळ आहे. पण या मुलाच्या शरीरातील 99.8 टक्के डीएनए त्याच्या स्वतःच्या पालकांचा आहे.

आईकडून बाळाला मिळते पॉवर हाउस

मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंटला एमआरटी म्हणजे मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट ट्रीटमेंटही म्हटले जाते. ही पद्धत इंग्लंडच्या डॉक्टरांनी विकसित केली आहे. इंग्लंडच्या न्यूकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये या अद्भूत मुलाचा जन्म झाला. पालकांचे अनुवांशिक आजार मुलांना जडू नये, हा हे मूल जन्मास घालण्यामागील उद्देश होता. सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला आपल्या आईकडून मायटोकॉन्ड्रिया मिळते.

मूल जनुकीय आजारांपासून मुक्त राहणार

त्यानुसार, जे काही हानिकारक उत्परिवर्तन (म्यूटेशन) घडते, ते या पॉवर हाऊसमध्ये जमा होते. त्यानंतर ते मुलाच्या आरोग्यावर परिणाम करते. अनुवांशिक आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यात काही अडचणी येतात. गर्भधारणा झाली तरी मुलांचे आरोग्य चांगले राहणार नाही. ते जसजसे मोठे होतात तसतसे त्याचा सामना गंभीर आजारांशी होतो. जगातील 6000 मुलांपैकी एकाला मायटोकॉन्ड्रियल आजार होतो.

मायटोकॉन्ड्रिया चांगला नसेल, तर विकास योग्य होत नाही

साधारणतः मानवी शरीरात प्रत्येक पेशीच्या केंद्रात 20 हजार जीन्स असतात. पण न्यूक्लियसच्या सभोवताली लहान ठिपक्यांसारखे मायटोकॉन्ड्रिया असतात. त्यांची स्वतःची जनुके असतात. मायटोकॉन्ड्रियाने सुरुळीत काम केले तरच त्यातून पेशींना ऊर्जा मिळते. त्यातून अवयवांचा विकास होतो. पण अनुवांशिक उत्परिवर्तन झाल्यास, मायटोकॉन्ड्रिया खराब होतो. त्यानंतर ऊर्जा संपुष्टात येते. त्याचा मेंदू, हृदय, स्नायू व यकृतावर परिणाम होतो. यामुळे बालकाचा विकास योग्य होत नाही.

MDT तंत्रज्ञानासाठी कायद्यात बदल

इंग्लंडच्या संसदेने 2015 मध्ये एमडीटी तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठी कायद्यात बदल केला. त्यानंतर 2 वर्षांनी न्यूकॅसल क्लिनिक हे तंत्र वापरण्याचा परवाना मिळालेले इंग्लंडमधील पहिले केंद्र बनले. त्यांनी ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्ब्रायॉलॉजी अथॉरिटीकडून मंजुरी घेऊन हा प्रयोग पुढे नेला. आता या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुपरकीड तयार करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अशी 5 हून कमी मुले जन्माला घालण्यात आली आहेत. पण त्यांच्यात सुपरकिड सारखी क्षमता नाही.

या प्रक्रियेतून जन्मलेल्या मुलांची व पालकांची माहिती गोपनीय ठेवली जाते. ती कुणालाच दिली जात नाही. तथापि, कोविड महामारीमुळे एमडीटीपासून जन्मलेल्या मुलांच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला. अन्यथा ही बातमी 2 वर्षांपूर्वीच मिळाली असती.

MDT म्हणजे नेमके काय?

सर्वप्रथम वडिलांचे शुक्राणू घेून त्याच्या मदतीने आईच्या अंड्यांचे फलन करण्यात आले. त्यानंतर निरोगी महिलेच्या अंड्यांमधून न्यूक्लिअर अनुवांशिक सामग्री काढली गेली. मग ते पालकांच्या फलित अंड्यांमध्ये मिसळले गेले. त्यामुळे फलित अंड्यांमधील गुणसूत्रांची संख्या पूर्ण झाली. आता या अंड्यावर निरोगी स्त्रीच्या मायटोकॉन्ड्रियाचे वर्चस्व आहे. कारण तो निरोगी असते. त्यानंतर ते गर्भामध्ये स्थापित केले जाते.

हे तंत्र सुरक्षित आहे का?

या तंत्रज्ञानात धोका नाही असे नाही. धोका आहे. नकळत अनावश्यक मायटोकॉन्ड्रिया अंड्याच्या आत आले तर ते बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. यामुळे सुपरकिड तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया संकटात सापडू शकते. मूल निरोगी होण्याऐवजी अशक्त किंवा अविकसित बनू शकते. म्हणूनच ही प्रक्रिया करताना डॉक्टर खूप काळजी घेतात.