आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Bairut Blast Effect : People Sit Up At Night And Suddenly Start Crying; The Psychiatrist Said We Are Still In Shock, How To Help

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बैरुत स्फोटाचे दुष्परिणाम:रात्री झोपेतून उठून बसतात लोक, अचानक रडायला लागतात; सध्या स्वत:च बरे होण्याची गरज असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे मत

बैरुत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी येताहेत, मुलांची समजूत काढण्यात जास्त अडचणी : मानसशास्त्रज्ञ

बैरुतमध्ये राहणाऱ्या सँड्रा अबिनाडार थोडासाही आवाज झाल्यास घाबरतात. एके दिवशी जार उघडत असताना अचानक आवाज झाल्याने त्या भीतीने जार तेथेच सोडून पळाल्या. १८ वर्षीय सँड्रा असो किंवा २४ वर्षीय लुर्डेस फाखरींना सध्या मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे. लुर्डेस तर अचानक रडायलाच लागतात.

बैरुतमध्ये झालेल्या स्फोटाला दोन आठवडे झाले आहेत. मात्र येथील नागरिक या घटनेतून अजूनही सावरू शकलेले नाहीत. असे असूनही सँड्रा मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्यास तयार नाहीत. त्या सांगतात, आम्ही समस्या सोडवायला शिकलो आहोत. तक्रार न करता आम्ही सहनही करायला लागलो आहोत. खरे तर या देशातील लोक अनेक वर्षांपासून गृहयुद्ध आणि सांप्रदायिक संघर्षाचा सामना करत आहेत. आता कोरोना आणि स्फोटानंतर तर ते आणखीच खचले आहेत. येथे डॉक्टर तर मानसिक आरोग्य आणीबाणीचा इशारा देत आहेत. कारण लोकांमध्ये वाईट स्वप्ने, अचानक रडणे, चिंता, राग आणि थकव्यासारख्या मानसिक आघाताची लक्षणे दिसत आहेत. मानसशास्त्रज्ञांनुसार, टीव्ही व सोशल मीडियावर स्फोटाची चित्रे वारंवार दाखवण्याचाही नकारात्मक परिणाम झाला आहे. मेंटल हेल्थ एनजीओ एम्ब्रेसशी संबंधित जैद दौनुसार, लोक हताश झाले आहेत.

मानसशास्त्रज्ञ वार्डे डाहेर सांगतात, आमच्या व्यवसायातील लोकांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र या स्फोटानंतर आम्हाला स्वत: आधी बरे होण्याची गरज असल्याचे लोकांना सांगावे लागत आहे. ओला खोदोर सांगतात, लोकांनी या प्रकारच्या समस्येचा कधीही सामना केलेला नाही.

मुलांची समजूत काढण्यात जास्त अडचणी : मानसशास्त्रज्ञ

मानसशास्त्रज्ञांनुसार, या घटनेनंतर मुलांची समजूत काढणे कठीण काम झाले आहे. काहीही झालेले नाही, हा तर केवळ खेळ होता, असे आई-वडिलांकडून मुलांना सांगितले जात आहे. जसे की एका वडिलांनी सांगितले, स्फोटानंतर त्यांच्या मुलाने विचारणा केली असता हा केवळ प्रिटेंड बूम गेम होता. ज्यात प्लेहाऊसमध्ये स्फोट झाला, असे त्याला सांगावे लागले.