आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ban On 11 Islamic Fundamentalist Organizations Including ISIS, Al Qaeda In Sri Lanka, 270 People Killed In Terrorist Attack On Ister Sunday 2 Years Ago; News And Live Updates

दहशतवादावर अंकुश:श्रीलंकेत इसिस, अलकायदासह 11 इस्लामिक संघटनांवर बंदी; दोन वर्षापूर्वी ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्यात 270 ठार झाले होते

कोलंबोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यात सुमारे 270 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 11 भारतीयांचा समावेश होता

श्रीलंका सरकारने देशात इसिस, अलकायदासह 11 इस्लामिक संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बुधवारी राजपत्रात अधिसुचना जारी करण्यात येणार असून त्यानंतर देशात यापूढे संबंधित संघटनांवर कायदेशीर बंदी असणार आहे. श्रीलंकेचे ॲटर्नी जनरल डप्पुला डी लिव्हेरा यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, इसिस, अलकायदासह स्थानिक नऊ संघटनांवर बंदी घालण्यास मान्यता दिली आहे.

11 भारतीय ठार झाले होते
श्रीलंकेत दोन वर्षापूवी म्हणजे 2019 मध्ये आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात सुमारे 270 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 11 भारतीयांचा समावेश होता. या घटनेत इसिस संबंधित नॅशलिस्ट तौहीद जमात या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेतील 3 चर्चंना लक्ष्य बनवले होते. त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी एक समिती गठीत करुन या संघटनेवरी बंदी घालण्यासाठी शिफारस केली होती.

बातम्या आणखी आहेत...