आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास एच-१ बी व्हिसावर लागू स्थगितीला उठवण्यात येईल, असे आश्वासन डेमाेक्रॅटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जाे. बायडेन यांनी दिले आहे. भारतीय माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिकांत या व्हिसाला खूप मागणी आहे. ट्रम्प प्रशासनाने गेल्या महिन्यात या व्हिसाला २०२० च्या अखेरपर्यंत निलंबित केले हाेते. बायडेनने आशियातील अमेरिकी लाेकांच्या मुद्यांवर आयाेजित डिजिटल कार्यक्रमात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, एच-१ बी व्हिसावर आलेल्या लाेकांची अमेरिकेच्या उभारणीत माेठी भूमिका आहे. त्यामुळेच कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी १.१ काेटी दस्तएेवजरहित स्थलांतरितांच्या नागरिकत्वाचा प्रश्न निकाली काढणार आहे. त्यासाठी संसदेत स्थलांतरित दुरुस्ती विधेयक आणेल. आमच्या िवधेयकात कुटुंबातील सदस्यांसाेबत राहण्यास महत्त्व दिले जाईल. ट्रम्प यांच्या प्रशासनातील स्थलांतरितांसाठी असलेले धाेरण क्रूर आहे. भारतासाेबतचे संबंध बळकट करण्यास आमचे सर्वाेच्च प्राधान्य असेल.
अॅप बंदी : मागे हटणार नसल्याचे भारताने दाखवले : निकी हेली
चीन कितीही आक्रमक असला तरी भारतवंशीय व रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या निकी हेली यांनी भारत-चीन संबंधावर ट्विट केले. हेली म्हणाल्या, चीन आक्रमक असले तरी मागे हटणार नसल्याचे भारताने दाखवून दिले. चीनच्या ५९ कंपन्यांच्या अॅपवर निर्बंध लावल्याचे पाहून आनंद वाटला.
लडाख : भारताविरुद्धचा कम्युनिस्ट पार्टीचा खरा चेहरा दिसला : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प म्हणाले, पूर्व लडाखमधील हिंसक धुमश्चक्रीच्या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनने जगाच्या इतर भागात दाखवलेली आक्रमकपणाची वागणूक भारत-चीन सीमेवरही दाखवली आहे. त्यातून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा खरा चेहरा दिसला.
१२ लाख भारतवंशीय मतदार, डेमोक्रॅटकडे कल
नॅशनल पब्लिक रेडिआेच्या म्हणण्यानुसार भारतीय-अमेरिकी समुदाय डेमोक्रॅट्सला मतदान करतात. २०१६ मध्ये २० टक्क्यांहून कमी भारतीयांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. परंतु यंदा हा ट्रेंड बदलू शकतो. त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती ट्रम्प यांच्यातील संबंध चांगले असणे हे कारण आहे. २००८ व २०१२ मध्ये बराक आेबामा यांना मतदान करणारे बहुतांश भारतीयांनी २०१६ मध्ये ट्रम्प यांना मते दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.