आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात कोरोना:व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने भीती; सौदीने एका आठवड्यासाठी इंटरनॅशनल फ्लाइट्स थांबवल्या, बॉर्डरही सील

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हायरसचे नवे रुप पहिल्यापेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते

एकीकडे जगात कोरोना व्हॅक्सिनची वाट पाहिली जात आहे. मात्र महामारीचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. ब्रिटेनमध्ये व्हॅक्सीनेशन सुरू होऊनही व्हायरसमध्ये म्यूटेशन (कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट) असल्याचे समोर आले आहे. हे पाहात सौदी अरब सरकारने इंटरनॅशनल फ्लाइट्सवर एक आठवड्याची बंदी घातली आहे. सौदीने आपल्या सीमा एका आठवड्यासाठी सील केल्या आहेत.

सरकारच्या वतीने असे म्हटले आहे की जे युरोपियन देशांमधून सौदीला आले आहेत त्यांना दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. त्याचबरोबर, जे गेल्या 3 महिन्यांत युरोपमधून किंवा नवीन कोरोना स्ट्रेनच्या भागांमधून आले आहेत, त्यांना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागेल. दरम्यान, तुर्कीनेही ब्रिटन, डेनमार्क, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सकडून येणाऱ्या उड्डाणांना तात्पुरती बंदी घातली आहे.

जगात कोरोनाचे 7 कोटी 71 लाख 69 हजार 359 केस झाल्या आहेत. विशेष म्हणजे 5 कोटी 40 लाख 88 हजार 483 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत महामारीमुळे 16 लाख 99 हजार 560 लोकांचा मृत्यू झाला आहे.

व्हायरसचे नवे रुप पहिल्यापेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते
व्हायरसमध्ये सातत्याने म्यूटेशन होत राहते. म्हणजेच याचा गुण बदलत राहतो. म्यूटेशन झाल्याने जास्तीत जास्त व्हेरिएंट स्वतःच संपतात, मात्र कधी-कधी हे पहिल्यापेक्षा जास्त पटींनी मजबूत आणि धोकादायक होते. ही प्रोसेस एवढ्या तेजीने होते की, वैज्ञानिकांना एक रुप समजत नाही, तोपर्यंत दुसरे नवीन रुप समोर येते. वैज्ञानिकांनना अंदाज आहे की, कोरोना व्हायरसचे जे नवीन रुप ब्रिटेनमध्ये आढळले आहे. ते पहिल्यापेक्षा 70% धोकादायक असू शकते.

बातम्या आणखी आहेत...