आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शाळेमध्ये पिस्तूल आणल्याने दप्तरावर बंदी! 13 वर्षीय विद्यार्थ्याने आणले पिस्तूल

इडाहाे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत बंदूक संस्कृती घातक हाेत चालली आहे. घराेघर शस्त्रे आहेत. काही मुले त्याला खेळणी समजून खेळू लागली आहेत. अलीकडे तेरा वर्षीय मुलाने आपल्या दप्तरात पिस्तूल टाकून ताे शाळेत गेला आणि शाळेत मित्रांना पिस्तूल दाखवू लागला. त्याच वेळी शिक्षकांची नजर त्याच्यावर पडली. त्यामुळे विपरीत घटना टळली. या घटनेनंतर इडाेहाेच्या चार शाळांत बॅकपॅक्सवर बंदी घालण्यात आली आहे. मुलांनी या बॅगेतून अशा प्रकारची शस्त्रे आणू नये, असा त्यामागील उद्देश आहे. मुलांनी शाळेत पुस्तके घेऊन आले पाहिजे. मुले असे करत नसतील तर त्यांना शाळेतून बाहेर काढले जाईल. अनेक पालकांनी या शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु विद्यार्थ्यांनी त्यास विराेध केला आहे. आता शाळेच्या विराेधात शाॅॅपिंग कार्ट, खेळणी व दाेरीत बांधलेली पुस्तके घेऊन ते शाळेत येत आहेत. एका विद्यार्थ्याच्या चुकीची सर्वांना शिक्षा का ? या विराेधातील व्हिडिआेही समोर आले.

जॅफर्सन स्कूलच्या प्रवक्त्या माॅनिका पाॅल म्हणाले, सर्व मुलांना सुरक्षित ठेवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. काेणताही मुलगा गनकल्चरचा बळी ठरू नये, असे आम्हाला वाटते. अनेक पालकांनीही त्याचे समर्थन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...