आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ब्रिटनमध्ये फिटनेस मोहीम:दुकानात एंट्री-एक्झिटवर गोड पदार्थांवर बंदी, टीव्हीवर रात्री नऊ वाजेपर्यंत जंक फूडच्या जाहिरातीही बंद

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेना विषाणू लठ्ठ लोकांसाठी अधिक घातक, यामुळे ब्रिटिश सरकारचे नवे नियम

ब्रिटन सरकारने लठ्ठपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लोकांना तंदुरुस्त बनवण्यासाठी सोमवारपासून एक मोठे अभियान सुरू केले आहे. कोविड-१९ मुळे मृत्यू होण्याऱ्यांत लठ्ठपणादेखील एक कारण असल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे मोठा निर्णय म्हणून बघितले जात आहे. खुद्द पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता ते अतिलठ्ठ असल्याचे मान्य केले होते. मात्र आता ते यातून बरे झाले असून स्वत:चे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते दररोज आपल्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला जातात. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी अर्धा किलोपेक्षा जास्त वजन घटवले आहे.

ब्रिटन युरोपमधील दुसरा सर्वाधिक लठ्ठ लोकांचा देश आहे. येथील दोन तृतीयांश युवक लठ्ठपणाच्या विळख्यात आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, १० ते ११ वयोगटात तीनपैकी एका मुलाचे वजन गरजेपेक्षा जास्त आहे. सरकारचे आरोग्य सचिव मॅट हानकॉक सांगतात, एका व्यक्तीने दररोज ५ पाउंड (साधारण दीड किलो) वजन घटवले तर पाच वर्षांत सरकारचे ९६० कोटी रुपये वाचतील. लठ्ठपणा आणि कोरोनाचा संबंध समोर आल्यानंतर वजन घटवणे जीव वाचवण्याप्रमाणेच आहे. यामुळे आता सरकार लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल. यासाठी आरोग्यास घातक असलेल्या अनेक उत्पादनांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या धोरणानुसार, दुकानातील प्रवेशाच्या ठिकाणी गोड किंवा चरबीयुक्त पदार्थ ठेवण्यावर बंदी घातली आहे. टीव्ही आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रात्री ९ वाजेच्या आधी जंक फूडच्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. तसेच आरोग्यासाठी घातक पदार्थांवर बाय वन गेट वन फ्रीसारखी स्कीमही नसेल. सरकार अल्कोहोल ड्रिंकवरही कॅलरी काउंट लावण्याचा विचार करत आहे.

दुकानदारांना फळे-भाजीपाल्यावर जास्त सूट देण्यासाठी प्रोत्साहन
- दुकानांना फळे व भाजीपाल्यावर जास्त सूट देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
- सरकार मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांच्या ऑनलाइन जाहिरातींवर बंदी घालण्याबाबत सल्ला घेईल.
- रेस्तराँ, कॅफे आणि टेकअवेसारख्या सर्व खाद्यपदार्थांवर कॅलरीचे प्रमाण लावणे गरजेचे.
- सरकार वेट मॅनेजमेंट सर्व्हिस वाढवणार. जीवनशैली सुधारण्यासाठी मोबाइल अॅप लाँच करणार.
- वजन घटवण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टरांना इन्सेन्टिव्ह देणार.