आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bangaladesh Hindu Temple Attacks । Demolition Kali Temple At ISKCON, The Murder Of A Temple Commity Member

बांग्लादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच:इस्कॉन येथील काली मंदिराची तोडफोड, मंदिर सदस्याची हत्या करून मृतदेह आढळला पाण्याच्या तलावात; बुधवारपासून दररोज होत आहेत हल्ले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांग्लादेशात हिंदू मंदिरांवरील हल्ले करणे सुरुच आहे. शुक्रवारी पुन्हा नाओखाली येथील इस्कॉन मंदिराची तोडफोड करण्यात आली. मंदिर समितीने दावा केला आहे की, 200 जणांचा टोळीने इस्कॉन मंदिरचे सदस्य पार्थो दास यांना बेदम मारहाण केली आहे. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या तलावामध्ये आढळला आहे. तर दुसऱ्या घटनेत शुक्रवार नाओखाली जिल्ह्यातील बेगमगंज परिसरातील जतन कुमार साहा यांची देखील हत्या करण्यात आली आहे. तर 17 जण गंभीर स्वरूपात जखमी आहे.

आज पुन्हा काही आतकंवाद्यांनी मुंशीगंज येथील दानियापारा माहा शोशन काली मंदिर येथे घुसून 6 मुर्तींची तोडफोड केली आहे. हा हल्ला आज पहाटे 3-4 दरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे. मंदिराला कोणत्याही प्रकारे सुरक्षा नसल्याने, आतकंवाद्यांनी मंदिरातील मुर्तींना लक्ष केले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. दानियापारा येथील महासचिव शुव्रत देव नाथ वासु यांनी सांगितले की, मंदिराचे कुलूप तोडून काही जण आत गेले असावे. याआधी कधीच अशी घटना घडली नसल्याचे शुव्रत यांनी सांगितले.

बुधवारपासून होत आहेत हिंदू मंदिरांवर हल्ले
बांग्लादेशात हिंदू मंदिराला लक्ष केले जात आहे. चिट्टागाव येथील दुर्गा मंदिरात बुधवारी हल्ला करण्यात आला होता. त्यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून, मंदिरात कुराण सापडले अशी खोटी माहिती व्हायरल झाली. तेव्हापासून बांग्लादेशात मंदिरावर हल्ले होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चांदपुर, चिट्टागांव, गाजीपुर, बंदरबन, चपाईनवाबगंज आणि मौलवीबाजार येथील परिसरातील मंदिरांवर तोडफोड करण्यात आली आहे.

तात्काळ अॅक्शन घेतली जाईल- हसीना
हिंदू मंदिरावर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल. अशी घोषणा बांग्लादेश सरकारने केली होती. बांग्लादेश येथील पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले होते की, कोमिला येथील झालेल्या दुर्घटनेचा पुर्णपणे सखोल पद्धतीने चौकशी केली जाईल. जो कोणी या प्रकरणात सापडेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला शिक्षा दिली जाईल. तो कोणत्याही समाजाचा का असेना त्याला शिक्षा नक्की दिली जाईल. असे हसीना यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...