आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Bangladesh Boat Accident | 28 People Drown Incljuding As Boat Capsizes In Bangladesh Buriganga River News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांग्लादेशात दुर्घटना:ढाकामध्ये बुधीगंगा नदीत बोट बुडाल्याने 28 जणांचा मृत्यू, बोटीत होते 100 हून अधिक लोक; अनेक जण बेपत्ता

ढाकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बुडीगंगा नदीत बुडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढत सुरक्षा कर्मचारी. सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात झाला. - Divya Marathi
बुडीगंगा नदीत बुडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढत सुरक्षा कर्मचारी. सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात झाला.
  • दुसऱ्या एका बोटीला धडकल्याने घटली घटना, अनेकांना वाचवण्यात यश
  • मृतांमध्ये 18 पुरुष, सात महिला आणि 3 मुलांचा समावेश

बांग्लादेशची राजधानी ढाकाजवळ बूढीगंगा नदीमध्ये बोट बुडाल्याने 28 लोकांचा मृत्यू झाला. या बोटीत 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. 28 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काहींनी पोहून आपले प्राण वाचवले तर काहींना बाहेर काढण्यात आले. प्रशासनाचे म्हणणे आहे की किती लोक वाचले आणि किती बेपत्ता आहेत, हे अद्याप कळू शकले नाही. दुसर्‍या बोटीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

ढाका येथील बुढीगंगा नदीवर अपघातानंतर लोक जमा झाले. दुसर्‍या बोटीला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.
ढाका येथील बुढीगंगा नदीवर अपघातानंतर लोक जमा झाले. दुसर्‍या बोटीला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.

ढाका येथून मुंशीगंजकडे जात होती बोट

ढाकाजवळील श्यामबाजार येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. 'मॉर्निंग बर्ड' नावाची बोट मुंशीगंजहून ढाकाकडे जात होती. सदरघाट टर्मिनलजवळ या बोटीची 'मोयुर-2' नावाच्या दुसऱ्या एका बोटीशी धडक झाली. यामध्ये मॉर्निंग बर्ड नाव पाण्यात बुडाली. काही लोकांनी पोहत आपले प्राण वाचवले तर काहींना बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत 18 पुरुष, 7 महिला आणि तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

 

अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकला फोनवर माहिती देताना रडू कोसळले. किती लोक बेपत्ता आहेत याबाबत माहिती नाही.
अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकला फोनवर माहिती देताना रडू कोसळले. किती लोक बेपत्ता आहेत याबाबत माहिती नाही.

अनेक लोक बेपत्ता 

प्रशासनाने सांगितले बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांचा अद्याप ओळख पटली नाही. आतापर्यंत किती जणांना बाहेर काढले आणि किती बेपत्ता आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. बचावकार्यासाठी नेव्ही, कोस्ट गार्डचे पथक आणि फायर सर्व्हिसची टीम तैनात केल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...