आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशातील कंटेनर डेपोला भीषण आग:44 ठार, 450 हून अधिक जखमी; अग्निशमन दलाच्या 19 गाड्या आग विझवण्याच्या प्रयत्नात

ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण-पूर्व बांगलादेशातील एका खासगी कंटेनर डेपोला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 'ढाका ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री चटगावमधील बीएम कंटेनर डेपोला आग लागली.

किमान 350 लोक चटगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (CMCH) दाखल असल्याचे चटगावमधील आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्तकुल इस्लाम यांनी सांगितले.

आगीचे कारण डेपोमध्ये ठेवलेले रसायन असू शकते
घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी नुरुल आलम यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत 44 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यादरम्यान अग्निशमन दलाच्या 3 जवानांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. डेपोमध्ये ठेवलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मृतांची ओळख पटलेली नाही.

16 रुग्णवाहिकाही घटनास्थळी हजर
पहिले एक कंटेनरला आग लागल्याची बातमी आली होती. त्यानंतर स्फोट होऊन आग पसरली. सध्या अग्निशमन दलाच्या १९ गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. 16 रुग्णवाहिकाही घटनास्थळी हजर आहेत.

बातम्या आणखी आहेत...