आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशची राजधानी ढाक्यातील प्रसिद्ध बंगाबाजारमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी 6 मार्केट आले ज्यात 2900 दुकाने आहेत. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणाच्या 48 तुकड्या कार्यरत होत्या.
या आगीत 8 जण होरपळले आहेत. अग्निशमन विभागाला सकाळी 6.10 वाजता आग लागल्याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दोन मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. आग विझविण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलालाही कामाला लावण्यात आले.
सामान काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी आगीत उडी घेतली
ढाका टाइम्सच्या वृत्तानुसार, आग सतत वाढत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी आपला माल वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली. धुराची आणि जिवाची पर्वा न करता लोक दुकानातून सामान बाहेर काढत होते.
मात्र, असे असतानाही बहुतांश दुकाने जळून खाक झाली असून केवळ राख उरली आहे. वृत्तानुसार, या भागातील बहुतांश दुकाने कपड्याची आहेत, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि ती अनियंत्रित झाली.
सेल्फी आणि गर्दीमुळे आग विझविण्यात अडचणी
ही भीषण आग पाहण्यासाठी बंगाबाजारमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांनी आगीजवळ सेल्फी काढून त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. त्याचवेळी पाण्याअभावी आग आटोक्यात आणण्यास विलंब होत होता.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचवेळी या आगीत काही लोकांचे सर्वस्व नष्ट झाले. शरीफुल इस्लाम यांनी ढाका टाइम्सला सांगितले की, मी कर्ज काढून व्यवसाय करत होतो, आता माझ्यासाठी सर्व काही संपले आहे.
आता 5 फोटोंमधून पाहा बंगाबाजारला लागलेली आग...
10 वेळा पत्र लिहून दुकानदारांना इशारा दिला, तरीही ऐकले नाहीत
ढाका टाइम्सच्या वृत्तानुसार अग्निशमन विभागाने दुकानदारांना किमान दहा वेळा सावध केले होते की शॉपिंग कॉम्प्लेक्स अजिबात सुरक्षित नाही. त्यात आग लागण्याचा धोका आहे. त्याचवेळी, डीजींनी सांगितले की, 6 तासांच्या प्रयत्नांनंतर आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी 5 सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.