आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bangladesh Hindu Devotees Reach Out After Police Violence Despite Help, ISKCON Appeals For Indian PM's Intervention

बांगलादेश:हिंदू भाविकांनी मदत मागूनही पोलिस हिंसाचारानंतर पोहोचले, इस्कॉनने भारतीय पंतप्रधानांच्या हस्तक्षेपासाठी केले आवाहन

ढाका3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता : हिंदू जागरण मंचाच्या वतीने शनिवारी बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. - Divya Marathi
कोलकाता : हिंदू जागरण मंचाच्या वतीने शनिवारी बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

बांगलादेशमध्ये दुर्गा मंडळात कुराणचा अपमान झाल्याची अफवा सोशल मीडियावरून झळकली आणि त्यानंतर लगेच हिंसाचार भडकला. या हिंसाचारात गेल्या चार दिवसांत मृतांची संख्या सहावर गेली आहे. सुमारे १५० लोक जखमी झाले आहेत. आता या प्रकरणात इस्कॉनचे प्रचार संचालक व्रजेंद्र नंदन दास म्हणाले, शुक्रवारी नोआखाली जिल्ह्यातील बेगमगंजमध्ये हल्ला झाला. प्रार्थनेनंतर पाचशे जणांच्या जमावाने आमच्या दोन अनुयायांची निर्दयीपणे हत्या केली. इस्कॉनचे संस्थापक प्रमुखपाद यांच्या १२५ व्या जयंतीची तयारी सुरू आहे. त्यांच्या मूर्तीचीही तोडफोड करण्यात आली. आमचे शिष्य मदतीसाठी धावा करत होते. परंतु हिंसाचार, तोडफोड व उपद्रव संपल्यावर पोलिस दाखल झाल्याची कैफियत त्यांनी मांडली आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. बुधवारी एका मंडपात कुराणचा कथित अपमान झाल्यानंतर कोमिल्ला व चांदपूरसह अनेक भागांत मंदिरांवर हल्ले झाले. सोबतच ८० दुर्गा मंडपांवरही हल्ले झाले. चांदपूरच्या हाजीगंजमध्ये संघर्ष व पोलिसांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला.

काबूल गुरुद्वारात दहा दिवसांत सशस्त्र हल्लेखोर दुसऱ्यांदा घुसले
काबूल | अफगाणिस्तानातील काबूल येथील गुरुद्वारात सशस्त्र हल्लेखोर दहा दिवसांत दुसऱ्यांदा घुसले. स्थानिक शीख म्हणाले, ते तालिबानी हल्लेखोर होते. त्यांनी तपास केला. त्यांच्यासोबतच्या २० हून जास्त साथीदारांनी धमकावले आणि पवित्र स्थानाची पवित्रता भंग केली. स्थानिक शीख समुदायाचे एक सदस्य म्हणाले, या पवित्र ठिकाणी रायफल व इतर शस्त्रे दडवण्यात आल्याचा दावा गुरुद्वारात घुसणाऱ्या तालिबानींनी केला. त्यांनी आमचे खासदार नरिंदरसिंह खालसा यांच्या कार्यालयाचीही झडती घेतली. नरिंदरसिंह सध्या भारतात आहेत. गुरुद्वारा अध्यक्ष व समुदायाच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला. मशिदींमध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटात शेकडो शिया मुस्लिमांचा मृत्यू झाला. त्यामुळे हिंदू व शीख समुदायात घबराट आहे.

निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप, अनेक घरे-दुकानांवरही हल्ले
इस्कॉन पदाधिकारी म्हणाले, नोआखाली जिल्ह्यात बेगमगंजमध्ये शुक्रवारी नमाजनंतर शेकडो लोकांच्या जमावाने रॅली काढली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. या जमावाने मंदिर व तेथील भाविकांवर हल्ला केला. नंतर अल्पसंख्यांक समुदायाच्या अनेक घरे-दुकानांवर हल्ले केले.

बातम्या आणखी आहेत...