आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशमध्ये रविवारी 14 हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 27 मूर्तींची तोडफोड करण्यात आली. बलियाडांगी उपजिल्हा ठाकूरगाव येथे ही घटना घडली. माहिती मिळताच उपायुक्त महबुबुर रहमान आणि एसपी मोहम्मद जहांगीर हुसेन घटनास्थळी पोहोचले.
सिंदूरपिंडीमध्ये 9, कॉलेजपारा येथे 4 आणि शाहबाजपूर नाथपारा परिसरात 14 मूर्ती तुटलेल्या आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. शेजारच्या देशात अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या प्रार्थनास्थळावर अशाप्रकारे हल्ला होण्याची गेल्या 5 महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
डोके, पाय, हात तोडून मूर्ती तलावात फेकल्या
उपजिल्हा निर्भाईचे अधिकारी बिपुल कुमार म्हणाले- काही मंदिरे रस्त्याच्या कडेला होती, त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ही घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली. अधिकारी म्हणाले, आम्ही परिसरात राहणाऱ्या हिंदूंना घाबरू नका असे सांगितले आहे. पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
दुसरीकडे, उपजिल्हा पूजा उत्सव परिषदेच्या सरचिटणीसांनी सांगितले की, बदमाशांनी मूर्तींचे हात, पाय आणि डोके तोडले. मूर्ती जवळच्या तलावात फेकण्यात आल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या संपूर्ण घटनेबाबत ठाकूरगावचे अधीक्षक मोहम्मद जहांगीर हुसेन यांनी सांगितले की, आम्ही या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवत आहोत. तपासानंतर सत्य बाहेर येईल. त्याचबरोबर मंदिरांवर झालेल्या हल्ल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदूरपिंडी भागातील रहिवासी काशिनाथ सिंह यांनी ढाका ट्रिब्यूनला सांगितले की, या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे.
गेल्या पाच महिन्यांतील हा दुसरा हल्ला
बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर गेल्या 5 महिन्यांतील हा दुसरा हल्ला आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी धर्मांधांनी काली मंदिरात घुसून मूर्ती तोडल्या. हे मंदिर ब्रिटिशकालीन आहे. झेनाईदह जिल्ह्यातील दौतिया गावात ही घटना घडली.आरोपींनी मूर्तीचे डोके मंदिर परिसरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर फेकून पळ काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.