आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशात हिंदूंवर निशाणा:मंदिरांवर हल्ल्यानंतर समाजकंटकांनी जाळले 65 हिंदू घरे; सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसा

​​​​​​​ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुक पोस्टमुळे लावण्यात आली आग

बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसक घटना वाढत आहेत. हिंदू मंदिरे आणि भाविकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता हिंदूंच्या घरांना आग लावण्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील रंगपूर जिल्ह्यातील पीरगंज उपजिल्हामध्ये सोशल मीडिया पोस्टमुळे काही लोकांनी हिंदू समाजाची घरे पेटवली. यामध्ये 20 घरे पूर्णपणे जळून राख झाली. ही घटना रविवारी सायंकाळी पीरगंजमधील रामनाथपूर युनियनमधील माळीपारा भागात घडली.

फेसबुक पोस्टमुळे लावण्यात आली आग
युनियन कौन्सिलचे अध्यक्ष मोहम्मद सादिकुल इस्लाम म्हणाले की, समाजकंटकानी 65 घरांना आग लावली आहे. जाळपोळ करणारे स्थानिक संघटना जमात-ए-इस्लामी आणि त्यांची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबीरचे सदस्य होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका हिंदू व्यक्तीने फेसबुकवर धर्माबद्दल अपमानास्पद पोस्ट केली, त्यानंतर दंगल भडकली.

बांगलादेशच्या दोन मंत्र्यांची दोन विधाने
बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या अनेक घटनांनंतर देशातील दोन मोठ्या मंत्र्यांनी दोन स्वतंत्र प्रसंगी जबाब दिले. गृहराज्यमंत्री असदुद्झमान खान यांनी रविवारी सांगितले की, दुर्गा पूजेच्या वेळी प हल्ले पूर्वनियोजित होते आणि हे षड्यंत्राचा भाग म्हणून केले गेले.

असदुद्झमान खान मंदिरांवर झालेल्या हल्ल्याबद्दल म्हणाले की, बांगलादेशमधील जातीय सलोखा नष्ट करणे हा त्यांचा हेतू आहे. बुधवारी कोमिला येथील हिंदू मंदिरावर लोकांवर प्रथम हल्ला झाला. यानंतर शेकडो ज्ञात आणि अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ढाका ट्रिब्यूननुसार, कोमिला हल्ला का झाला, असे विचारल्यावर मंत्री म्हणाले की, आम्हाला सर्व पुरावे मिळताच आम्ही ते सार्वजनिक करू आणि सर्व दोषींना शिक्षा करू.

बातम्या आणखी आहेत...