आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयकडून गुन्हा दाखल:गुजरातमध्ये बँक ऑफ इंडियाला 39 कोटींना गंडवले

पवनकुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -गुजरातमध्ये एका कंपनीने बँक ऑफ इंडियाला ३९ कोटी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले आहे. अहमदाबाद येथील अनिल न्यूट्रिएंट्स लिमिटेड कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने कंपनीचे संचालक गांधीनगर येथील रहिवासी अमोल श्रीपाल शेठ, संचालक नलिन कुमार ठाकूर, संचालक निलेश ठाकूरसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. २०१४ मध्ये या कंपनीने बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली अनेक बँकांच्या समुहाकडून ७३ कोटींची विड्रॉल कॅश मर्यादा घेतली होती. त्यात ४८ कोटी रुपये बँक ऑफ इंडियाकडून घेतले होते. कंपनीने क्रेडिटचा वापर करून नातेवाईकांच्या नावे सहकारी कंपन्यांच्या नावे कोट्यवधी रुपये हस्तांतरित केले.

बातम्या आणखी आहेत...