आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी सरकार विरोधात बप्पी लहरींचे 'जि मी':लॉकडाऊन - उपासमारीने वैतागलेल्या नागरिकांनी गायले - जि मी-जि मी, म्हणजेच - मला भात द्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये सध्या वाढत्या कोरोनाचे रुग्ण पाहता लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांचे खायचे वांदे झाले आहेत. याबाबत आता लोक वेगळ्या पद्धतीने सरकारला विरोध करत आहेत. भारतीय हिंदी गायक बप्पी लहरी यांचे 1982 मधील ‘जिमी-जिमी आजा आजा’ हे गाणे गाजले आहे. पण यात खास गोष्ट म्हणजे, हे गाणे हिंदीत नाही तर मँडारिन भाषेत भाषांतरित करण्यात आले आहे. जे चीनमध्ये जि मी, जि मी’ (Jie mi, Jie mi) असे व्हायरल होत आहे. म्हणजे- मला भात द्या, भात द्या.

व्हिडिओमध्ये दाखवले रिकामे भांडे
लोक रिकामी भांडी दाखवून या गाण्यावर व्हिडिओ आणि रील्स बनवत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांकडे अन्न शिल्लक नाही, असे यातून ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच लोक सरकारवर नाराजीही व्यक्त करत आहेत.

कडक लॉकडाऊनचे आदेश
गेल्या महिन्यात देशाचे अध्यक्ष शी-जिनपिंग यांनी देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले होते. यानंतर तेथे लॉकडाऊन लागू करण्यात आला. शी जिनपिंग म्हणाले होते की, लॉकडाऊन दरम्यान कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. व्हायरस थांबवायचा असेल तर त्याचे पालन करावे लागेल. कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यास त्याला क्वारंटाईन केले जाईल.

कोरोना रुग्णाला नेण्यासाठी पोहोचले क्रेन

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक शहरांत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. या नियमाचे पालन करताना एका रुग्णाला थेट क्रेनने उचलून रुग्णालयात नेण्यात आल्याची अजब घटना उजेडात आली आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

चीनच्या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

चीनचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघायमध्ये कोविड प्रकरण वाढल्यानंतर शाळा-कॉलेज आणि इतर संस्था बंद करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी शांघायमध्ये कोविडचे 47 रुग्ण आढळले, जे गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक आहे. दोन रुग्ण वगळता इतर सर्व जणांना क्वारंटाईन केले आहेत. येथे वाचा पुर्ण बातमी

चीनचे कोविड आयसोलेशन सेंटर तुरुंगासारखे

चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. येथे दररोज हजाराहून अधिक रग्ण समोर येत आहेत. त्यामुळे चीनच्या अनेक प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, बिझनेस टायकून हर्ष गोएंका यांनी चीनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुरुंगातील काही खोल्या दिसत आहेत. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...