आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बॅरियाट्रिक सर्जरीद्वारे कर्करोगाचा धोकाही कमी, अमेरिकन मेडिकल जर्नलमध्ये नव्या संशोधनातील दावा

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत प्रत्येकी चारपैकी एका वयस्कराला मद्यपानाची सवय असल्याने नव्हे तर स्थूलपणामुळे फॅटी लिव्हरच्या गंभीर आजाराला ताेंड द्यावे लागत आहे. फॅटी लिव्हरवर काहीही उपचार नाही. डाॅक्टर केवळ वजन कमी करणे आणि पाेषणयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. जर्नल आॅफ द अमेरिकन मेडिकल असाेसिएशनच्या शाेधानुसार बॅरियाट्रिक सर्जरीमुळे लठ्ठपणापासून सुटका हाेते. त्याचबराेबर फॅटी लिव्हर आणि यकृताच्या कर्कराेगासारख्या जीवघेण्या आजारांचा धाेकाही कमी हाेताे. या संशाेधन प्रकल्पात ११०० लाेक सहभागी झाले हाेते. बॅरियाट्रिक सर्जरी झालेले हे लाेक हाेते. या लाेकांचा आता शस्त्रक्रिया केल्याच्या दहा वर्षांपर्यंत कर्कराेग व यकृतसंबंधी गंभीर आजारांचा धाेका ९० टक्के कमी झाला आहे. बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करणाऱ्या ६५० जणांपैकी केवळ ५ जणांना यकृताचा गंभीर आजार आहे. शस्त्रक्रिया न करणाऱ्या ५०८ पैकी ४० जणांना यकृताचे गंभीर आजार आहेत.

या शस्त्रक्रियेमुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताही ७० टक्के कमी
बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया लठ्ठपणामुळे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताही ७० टक्क्याने कमी करते. संशाेधनाचे नेतृत्व करणारे डाॅ. अली अमिनएन म्हणाले, लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरची समस्या समाेर आली आहे. यकृतावर जास्त प्रमाणात मेद जमा हाेताे. यकृतामध्ये जळजळ वाटू लागते. त्यातून पुढच्या काळात लिव्हर साेरायसिससारख्या जीवघेण्या आजाराचा धाेका असताे. रुग्णाच्या शरीराचे वजन कमी झाल्यावर लिव्हरमधील मेदही कमी हाेताे.

बातम्या आणखी आहेत...