आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय:कृष्णवर्णीय-लॅटिनो बिल्डरांच्या यशाच्या मार्गात अडथळे

कोलेट कोलमॅनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सुमारे एक लाख १२ हजार रियल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्या आहेत. यातील एक लाख ११ हजार कंपन्यांचे मालक श्वेत आहेत. वरिष्ठ पातळीवर तर परिस्थिती आणखी वाईट आहे. एका नव्या अहवालानुसार वर्षाला ४०० कोटी रुपये मिळकतीचे ३८३ बिल्डर केवळ एक लॅटिनो आहेत. या रांगेत एकही कृष्णवर्णीय नाही. अर्थतज्ज्ञ सामाजिक रणनीतिकार आणि सामाजिक उद्योजकांनी बांधकाम क्षेत्रातील असमानतेचा अभ्यास केला आहे. त्यांचा अहवाल कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकन देशांतून आलेल्या बांधकाम व्यावसायिकांवर केंद्रित आहे. कृष्णवर्णीय आणि लॅटिनोंचे प्रतिनिधित्व कमी असण्याचा प्रारंभ भांडवलाच्या उपलब्धतेने होते. सुमारे एक लाख १२ हजार रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्या आहेत. त्यांना काम सुरू करण्यासाठी आवश्यक धन मिळत नाही. बिल्डर रेसिली किंग म्हणाले, मला आणि अनेक विकासकांना मित्र आणि कुटुंबीयांकडून पैसे जमवावे लागतात. येथील एका तथ्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. श्वेतांच्या तुलनेत कृष्णवर्णीय आणि लॅटिनो लोकांच्या आर्थिक परिस्थितीत खूप फरक आहे. सरासरी मध्यमवर्गीय श्वेत कुटुंबीयांची संपत्ती एक कोटी ५० लाख रुपये आहे. त्यांच्या तुलनेत कृष्णवर्णीयांची संपत्ती १९ लाख रुपये आणि लॅटिनोंची २९ लाख रुपये आहे. तीनचतुर्थांश श्वेत कुटुंबीयांकडे स्वत:चे घर आहे. परंतु निम्म्याहून कमी कृष्णवर्णीय आणि लॅटिनो कुटुंबीयांकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे कृष्णवर्णीय बिल्डरांची संख्या आपोआपच कमी होते. अमेरिकेतील यशस्वी बिल्डरांपैकी ७१ वर्षीय व्हिक्टर मेकफरलेन म्हणाले, भांडवलाच्या कमतरतेमुळे कृष्णवर्णीय, लॅटिनोंना यश मिळत नाही. अनेक दशकांचा अनुभव असलेले ६३ वर्षीय बिल्डर डॉन पीबल म्हणाले की, व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटीच्या १.३ टक्केपेक्षाही कमी भांडवल महिला आणि कृष्णवर्णीयांच्या कंपन्यांना मिळाले आहे. म्हणजेच ९८.७ टक्के पैसे श्वेतांना मिळाले आहेत. व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी कृष्णवर्णीय, लॅटिनोंच्या कंपन्यांत भांडवल गुंतवण्यासाठी कठोर नियम आणि अटी घातल्या आहेत. त्यांना वीस ते तीस टक्के पैसे लावावे लागतात. कामाचा अनुभव सांगावा लागतो. अध्ययनात आढळले की, कृष्णवर्णीय आणि लॅटिनो बिल्डर्सच्या अनेक छोट्या समुहांनी काही प्रकरणांत श्वेत बिल्डर्सना मागे टाकलेय. नम्न स्तरावर वार्षिक दोन कोटी ८५ लाख आय असलेले कृष्णवर्णीय आणि लॅटिनो बिल्डर सरासरीत श्वेतांपेक्षा पुढे आहेत. असमानता 111013 श्वेतांच्या मालकीच्या कंपन्या 447 कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या कंपन्या 175 लेटिनोंच्या मालकीच्या कंपन्या

बातम्या आणखी आहेत...