आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Batti Gul Of Pakistan | 116 Stations Shut Down Due To National Grid Failure, 90 Percent Factories In Punjab, Sindh Province, Metro Closed

पाकिस्तानची बत्ती गुल:नॅशनल ग्रीड बिघाडाने116 स्टेशन ठप्प, पंजाब, सिंध प्रांतातील 90 टक्के कारखाने, मेट्रो बंद

इस्लामाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नॅशनल ग्रीड डाऊन झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. फ्रिक्वेन्सीमधील दोषामुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे देशातील ११७ ग्रीड स्टेशन ठप्प झाले.

पंजाब, सिंध प्रांतातील ९०% कारखाने बंद पडले. लाहोर मेट्रोही बंद करावी लागली. इस्लामाबाद, रावळपिंडी, कराचीसारख्या मोठ्या शहरांतील जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला. बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वामध्येही वीजपुरवठा खंडित झाला. पाकिस्तान सरकारने सायंकाळी सातनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा केला. सर्व शहरांत वीजपुरवठा सुरू होण्यास आणखी काही वेळ लागेल, असे सांगण्यात आले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...