आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Be Like Pak, Stay In The Advantage; China Tempts Neighboring Afghanistan, Nepal To Give Corona Vaccine!

दिव्य मराठी विशेष:पाकसारखे व्हा, फायद्यात राहाल; शेजारी देश अफगाण, नेपाळला चीनने दिले कोरोनाच्या लसीचेही प्रलोभन!

बीजिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाक, अफगाण, नेपाळ समकक्षांसोबत व्हर्च्युअल बैठक
  • तिन्ही देशांना लस देण्याचेही आश्वासन, भारतापासून दूर करण्याचे होते प्रयत्न

भारताशी असलेल्या तणावादरम्यान चीनने शेजारी देशांना लालूच देण्याचे उद्योग सुरू ठेवले आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी यांनी सोमवारी पहिल्यांदा पाकिस्तान, अफगाणिस्तान व नेपाळच्या परराष्ट्रमंत्री स्तरावर व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन केले होते. त्याचा अजेंडा कोरोना महामारी, आर्थिक मदत व चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड असा होता. त्यातही या तीन देशांना भारतापासून दूर करणे हेच मनसुबे यामागे होते, हे दिसून आले.

वांग यी यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी पाकिस्तान व चीनच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. उर्वरित दोन्ही देशांनीदेखील पाकिस्तानच्या मार्गावरून वाटचाल करायला हवी, तरच फायद्यात राहाल. वांग यांनी पाकिस्तान व चीनला आयर्न ब्रदर्स असे संबोधत दोन्ही देशांना सहकार्याच्या बाबतीत आदर्श असल्याचे म्हटले. चांगला शेजारी मिळावा यासाठी नशीब लागते. चीन-पाकिस्तानकडून अफगाणिस्तान, नेपाळनेदेखील कोरोना, आर्थिक घडामोडी व परस्पर संवादाबाबत चीनसोबत संयुक्त कारवाई केली पाहिजे.

कोरोना महामारीविरोधात चारही देशांनी सहकार्य करावे. लवकरच परस्परांसाठी मदतीचे मार्ग सुरू केले पाहिजेत.

अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्रमंत्री मोहंमद हनीफ व नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावली बैठकीत सहभागी झाले होते. पाकिस्तानकडून आर्थिक विभागाचे मंत्री मकदूम खुसरो बख्तियार हे बैठकीत सहभागी झाले.

वांग यांनी तिनही देशांना लस देऊ, अशी ऑफरही दिली. वांग म्हणाले, चीनची लस तयार झाल्यानंतर या तिन्ही देशांना लस उपलब्ध करून दिली जाईल. महामारीनंतर चारही देेशांनी बेल्ट अँड रोड प्रकल्पावर पुन्हा काम सुरू केले पाहिजे. आम्ही चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे बांधकाम हिमालयाच्या संपर्काच्या दृष्टीने वाढवणार आहोत.

दुसरीकडे बांगलादेश व पाकिस्तान यांच्यातील जवळीक वाढू लागली आहे. आठवड्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली होती.

अत्याचाराची आठवण

त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमीन यांनी शेख हसीना यांना पाकिस्तान सैन्याने केलेल्या अत्याचाराची आठवण करून दिली. अत्याचाराला कधीही विसरता कामा नये, असा सल्ला त्यांनी हसीना यांना दिला.

जपान चिनी अॅपची करणार तपासणी :

जपानमध्ये सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी चीनच्या अॅपमुळे होणाऱ्या धोक्याबाबतचे विश्लेषण करणार आहे. त्या अहवालानंतर अॅपबाबत निर्णय घेणार आहे.