आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मॅन व्हर्सेस वाइल्ड' या अॅडव्हेंचर शोद्वारे अवघ्या जगात विख्यात झालेले बेयर ग्रिल्स युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पोहोचलेत. तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. ग्रिल्स आपला नवा शो 'बट गॉट सो मच मोर'ची शूटिंगसाठी एक आठवडाभर कीव्हमध्ये राहणार आहेत.
बेयर ग्रिल्स आपल्या नव्या कार्यक्रमात युक्रेनमधील स्थिती, तिथे राहणारे नागरिक व झेलेन्स्कींचे सर्व्हायव्हल स्किल्स दाखवणार आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर झेलेन्स्कींसोबतचे काही फोटोही शेयर केलेत. सोबतच एक नोटही लिहिली आहे.
प्रेक्षकांना सर्व्हायव्हर स्किल्स दाखवण्याची इच्छा : ग्रिल्स
ग्रिल्स एका पोस्टद्वारे म्हणाला - या आठवड्यात मला युक्रेनची राजधानी कीव्हचा दौरा करण्याची व राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी खास क्षण आहे. युक्रेनमध्ये हिवाळा सुरू झाला आहे. बर्फवृष्टी सुरू आहे. तापमान मायनसमध्ये पोहोचले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त झाले आहे. जनतेला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. झेलेन्स्की नेहमीच आपल्या नागरिकांच्या मदतीसाठी उभे राहतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना झेलेन्स्कींच्या अनेक गोष्टी पहावयास मिळतील. युक्रेनच्या जनतेने युद्धाच्या स्थितीत स्वतःला कसे सावरले हे प्रेक्षकांना दाखवण्याची माझी इच्छा आहे.
बेयर ग्रिल्स व झेलेन्स्कींनी ही छायाचित्रे शेयर केली...
बेयर ग्रिल्स यांनी PM मोदींसोबतही केली शूटिंग
पंतप्रधान मोदी व बेयर ग्रिल्ससोबतचा मॅन व्हर्सेस वाइल्डचा एपिसोड 12 ऑगस्ट 2019 रोजी डिस्कव्हरी चॅनलवर प्रक्षेपित झाला होता. त्यात त्यांनी मोदींना विचारले होते - ‘तुम्ही बालपणी जंगलात खूप वेळ घातल्याचे मी ऐकले आहे? त्यावर मोदी म्हणाले होते- मी हिमालयात जात होतो. वयाच्या 17-18 व्या वर्षीच मी घर सोडले होते. त्यानंतर मी खूप विचार विनिमय केला. निसर्गाच्या सानिध्यात राहणे मला आवडत होते.
बेयर मोदींना भाला देत म्हणाला होता - एखादा वाघ तुमच्याकडे येताना दिसला तर त्याला याने ठार मारा. त्यावर मोदी म्हणाले होते - कुणाला ठार मारणे माझ्या संस्कारात नाही. पण तुमच्या सुरक्षेसाठी हे मी माझ्याकडे ठेवेल.
युक्रेनच्या नागरिकांचे इरादेही आपल्या लष्करासारखेच
युक्रेनच्या अनेक शहरांत पाणी व विजेचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना आपल्या मूर्खपणाची जाणिव व्हावी अशी युक्रेनच्या जनतेची इच्छा आहे. एक नागरिक म्हणाला - यंदाचा हिवाळा युक्रेनच्या इतिहासातील सर्वात कठीण हिवाळा ठरेल. पण आम्ही तयार आहोत.
आम्ही पाणी-वीज, फोन, मोबाइल, इंटरनेटशिवायही जगू. पण रशिया आमच्यावर थोपू पाहणारी गुलामगिरी आम्हाला मान्य नाही. कडाक्याच्या थंडीमुळे आम्ही प्राणांची भीक मागू असे त्यांना वाटते. पण आम्ही त्यांचे मनसुबे उधळून टाकू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.