आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Behind Visa Ban On Indians; Announced After Two Years From China, Kavid Brings Relief To Business And Relatives

व्हिसा बंदी मागे:भारतीयांवरील व्हिसा बंदी मागे; चीनकडून दाेन वर्षांनंतर जाहीर, काेविडमुळे व्यावसायिक व नातेवाइकांना दिलासा

बीजिंग16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेविडमुळे गेल्या दाेन वर्षांपासून भारतीय व्यावसायिक, विद्यार्थ्यांवर असलेली व्हिसा बंदी मागे घेण्याचा निर्णय चीनने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे चीनच्या विविध शहरांत काम करणारे भारतीय कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल.

चीनच्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजाराे भारतीय विद्यार्थ्यांनी परत अध्ययन करण्यासाठी व्हिसाची परवानगी मागितली आहे. त्यावरही चीन प्रशासन काम करत असल्याचे सांगण्यात आले. साेमवारी चीनच्या राजदूत कार्यालयाने काेविड-१९ व्हिसा धाेरणात बदल करणार असल्याचे स्पष्ट केले हाेते. दाेन वर्षांनंतर व्हिसाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...