आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिट अँड राइज टेस्ट:काेणतीही मदत न घेता जमिनीवर मांडी घालून बसू किंवा उठू शकत असल्यास तुमच्या तंदुरुस्तीला गाेल्डन स्टार देऊ शकता

न्यूयाॅर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केली स्टारेट जगप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आहेत. ते वाॅटर स्पाेर्ट‌्समधील विजेतेही आहेत. करिअरमध्ये तीन आंतरराष्ट्रीय, ५ राष्ट्रीय किताब त्यांनी जिंकले. बेस्टसेलर बिकमिंग अ सपल लेपर्ड आणि डेस्कबाउंडचे ते लेखक आहेत. जमिनीवर मांडी घालून बसल्याने त्रास दूर पळतात, हे त्यांनी नव्या पुस्तकातून सांगितले. त्याबद्दल थोडेसे ...

जमिनीवर दरराेज ३० मिनिटे मांडी घालून बसण्याची सवय लावा. पाठीच्या वेदनांसह इतर आजारांतूनही बाहेर पडता येईल जमिनीवर दरराेज ३० मिनिटे मांडी घालून बसल्याने तुम्हाला जिवंतपणा जाणवेल. पाठीच्या वेदनेतून मुक्तता मिळेल. खुर्चीवर दीर्घकाळ बसण्याचा संबंध थेट अल्पवयाशी जाेडलेला हे आपण जाणताे. यातून पाठदुखीपासून इतर अनेक समस्या निर्माण हाेतात. परंतु दरराेज जमिनीवर १५ ते ३० मिनिटे मांडी घालून बसल्याने या समस्येतून सुटका हाेऊ शकते. ही सवय तुम्हाला ऊर्जावान बनवेल. आमच्याकडे प्रशिक्षणासाठी येणारे सैन्य अधिकारी व आॅलिम्पिक अॅथलिट्स यांनाही आम्ही हा सल्ला देताे. फरशीवर बसणे एवढे महत्त्वाचे का? माणसाची रचना जमिनीवर बसण्यासाठी अनुकूल आहे. जगभरातील एक तृतीयांश लाेकसंख्या अजूनही गुडघे वाकवून किंवा मांडी घालून बसणारी आहे. खुर्चीवर बसल्यानंतर जांघेच्या वरील हाडे, सांधे, हिप जाॅइंट्सची स्थिती स्थिर राहणे कठीण हाेते. अशा स्थितीत शरीर अन्य प्रकारे समस्येचे निराकरण करते.

पाठ, पायातील मांसपेशी शरीराच्या वरील भागाला विविध दिशांमध्ये जाण्यास राेखतात. हा प्रयत्न पाठीच्या कण्यात ओढाताण निर्माण करताे. म्हणूनच जास्त वेळ बसल्याने पाठीत वेदना हाेऊ लागतात. दरराेज मांडी घालून बसल्याने शरीराच्या खालच्या भागाला सैल करता येते. त्यामागील आणखी एक वैज्ञानिक पैलूही पाहा. २०१४ मध्ये युराेपियन जर्नल आॅफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलाॅजीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार जमिनीवर मदतीविना उठण्याच्या क्षमता पाहण्यासाठी ‘सिट अँड राइज’ चाचणी केली. त्यात ५१ ते ८० या वयाेगटातील २ हजार स्त्री-पुरुष सहभागी झाले हाेते. काेणत्याही आधाराविना बसणे व उठण्यातील असमर्थता मृत्यूच्या जाेखमीशी जाेडलेली आहे. त्याउलट मदतविना बसणे आणि उठण्याची क्षमता शरीराला स्थिर, कुशल बनवते. हे लक्षात घेऊनच दाेन गाेष्टींचा सल्ला दिला आहे. स्वत:ला ओळखण्यासाठी सिट अँड राइज चाचणी स्वत: करून पाहा. म्हणूनच काुणाचीही मदत न घेता जमिनीवर मांडी घालून बसता आणि उठता येत असल्यास तुमच्या क्षमतेत सुधारणा हाेईल. ताजेपणा अनुभवता येईल.