आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातूम्ही आपल्या संवेदनशीलतेबाबत कधी मोकळेपणाने बोलला आहात का? कदाचित नाही. अशी बरीच वैशिष्ट्य असतात ज्या विषयी आपण खूप गर्वाने बोलत असतो. मात्र, संवेदनशीलता हा असा गुण आहे, जो सामान्यपणा दुबळेपणाच्या रूपात पाहिला जातो. सेन्सिटिव्ह रेफ्यूज वेबसाइटचे संस्थापक आंद्रे सोलो आणि झेन ग्रेनमेन यंाच्यानुसार याचा अर्थ तुम्ही नाजूक आहात, जास्त प्रतिसाद देत आहात. पुरुषांनी जास्त संवेदशनशील असायला नको,असे म्हटले जाते. दुसरीकडे, महिलांना सल्ला दिला जातो की, त्यांनी खूप जास्त संवेदनशील असायला नको. त्यांच्या म्हणण्यानुसार, संवेदनशीलता अनुवंशिक आहे आणि ती तुम्ही नष्ट करू शकत नाहीत. तसा प्रयत्न करणे तुम्हाला आयुष्यातील गिफ्टपासून वंचित करेल.
सर्जनशीलता: संवेदशील लोक सर्जनशील असतात. जवळपास बहुतांश कलाकार, संगीतकार संवेदनशील मानले जातात. खोल विचार केल्याने उपाय शोधण्यात ते जास्त सक्षम ठरतात.
निर्णय क्षमता: अभ्यासानुसार, लक्षात ठेवणे वा ओळखण्याच्या कार्यात संवेदनशील लोक चांगले निष्कर्ष देतात. चांगले निर्णय घेण्यात सक्षम ठरतात.
बूस्ट इफेक्ट: संवेदनशीलतेचा सर्वात मोठा लाभ बूस्ट इफेक्ट आहे. कुणाची मदत करण्याच्या बाबींमुळे त्यांना प्रोत्साहन मिळते.
घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील जोडप्यावर अभ्यास २०२२ मध्ये घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या दांपत्यावरील अभ्यासात त्यांच्यातील नातेसंबंध सुधारण्यावर प्रशिक्षण दिले. यानंतर पॅर्सनॅलिटी टेस्टमध्ये अाढळले की, ज्या जोडप्यांनी घटस्फोटाचा विचार बदलला, त्यात एक संवेदनशील जोडीदार होता. हे फक्त नात्यांपर्यंत मर्यादीत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.