आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलारुस:26 वर्षांच्या हुकूमशाहीला 37 वर्षीय शिक्षिकेचे आ‌व्हान; म्हणाल्या, फक्त निवडणूक हरले हिंमत नाही; संघर्ष सुरूच राहणार

मिंस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 65 वर्षीय लुकाशेंको सहाव्यांदा राष्ट्राध्यक्षे, स्वेतलानांना 9% मते मिळाली

६५ वर्षीय लुकाशेंको यांनी सहाव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी आपल्या विरोधक स्वेतलाना तिखानोव्सना यांचा पराभव केला. राष्ट्राध्यक्ष १९९४ मध्ये निवडणूक जिंकले तेव्हा स्वेतलाना ९ वर्षांच्या होत्या. आता ३७ वर्षीय स्वेतलाना यांनी लुकाशेंको यांना आव्हान दिले होेते.

निकालानंतर मीडियात सुरू असलेल्या चर्चेत सांगितले की, लोकांनी रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनातून सरकारविरोधी चित्र स्पष्ट झाले होते. माझ्या रॅलीमध्ये गर्दी झाल्यापासून लोकांना परिवर्तन हवे आहे हे स्पष्ट झाले होते. मात्र असे होऊ दिले नाही. स्वेतलाना यांनी सांगितले, मी केवळ निवडणूक हरले आहे, हिंमत नाही. हुकूमशाहीच्या विरोधात माझा संघर्ष सुरूच राहील. स्वेतलाना यांनी तुरुंगात कैद असलेल्या पतीच्या जागी निवडणूक लढवली. विरोधकांच्या अनेक मोठ्या मोर्चांचे त्यांनी नेतृत्व केले. या सभा, मोर्चांमध्ये ऐतिहासिक गर्दी उसळली. असे देशात यापूर्वी कधीही झाले नव्हते. स्वेतलाना यांनी शिक्षिका म्हणून काम केले आहे. पतीला अटक झाल्यानंतर आणि मतदानासाठी नोंदणीवर आणलेल्या बंदीनंतर स्वेतलाना यांनी राजकारणात प्रवेश केला. देशात पारदर्शक निवडणुका शक्य नसल्याचे त्या सुरुवातीपासूनच सांगत होत्या.

विरोधकांची सर्वात मोठी रॅली, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला
यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठा हिंसाचार झाला. इतर शहरांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. मिंस्क पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी बळाचाही वापर केला. पोलिसांनी केेलेल्या या कारवाईत अनेक लोक जखमी झाले. रविवारच्या एक्झिट पोलनंतर बेलारुसमध्ये गेल्या काही वर्षांमधील विरोधकांची सर्वात मोठी रॅली बघायला मिळाल्याचे म्हटले जात होते.

बातम्या आणखी आहेत...