आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याने 30 वर्षांनंतर घेतला अपमानाचा बदला:बेल्जियमध्ये चाकूने १०१ वेळा भोसकून शिक्षिकेची निघृण हत्या, १६ महिन्यांच्या तपासानंतर झाला उलगडा

ब्रुसेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील एका विद्यार्थ्याने ३० वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या शिक्षिकेची चाकूने तब्बल १०१ वेळा भोसकून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. आरोपी विद्यार्थी गुंटर यूवेंट्स ३७ वर्षांचा आहे. त्याच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका मारिया वेरलिंडन यांनी १९९० च्या दशकात त्याचा अपमान केला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने २०२० मध्ये त्यांची निघृण हत्या केली होती.

बेल्जियम पोलिसांनी सलग १६ महिन्यांपर्यंत या हत्याकांडाची वेगवेगळ्या अंगाने चौकशी केली. त्यात त्यांनी शेकडो DNA नमुण्यांची पडताळणी केली. त्यानंतरही त्यांना या खूनाचे कोणतेही धागेदोरे मिळाले नाही. त्यामुळे ५९ वर्षीय मारिया यांच्या पतीने साक्षीदारांना पुढे येवून तपासात सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले.

अखेर हत्येच्या १६ महिन्यांनी यूव्हेंट्सच्या एका मित्राने पोलिसांना या घटनेची खबर दिली. त्यानंतर रविवारी यूवेंट्सला अटक करुन त्याच्या DNA ची हत्येच्या ठिकाणी आढळलेल्या पुराव्यांशी जुळवणी केली असता या हत्याकांडावरील पडदा दूर झाला.

शिक्षिकेची हत्या झाली तेव्हा, त्यांच्याकडे रोख रकमेने भरलेली पर्स होती. पण, आरोपीने तिला साधा स्पर्षही केला नाही. त्यामुळे या हत्येचा हेतू चोरी नव्हता हे स्पष्ट होते. अटकेनंतर यूवेंट्सने पोलिसांना या घटनेची सखोल माहिती दिली. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला.

मारिया वेरलिंडन यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक महिला होत्या. त्यानी अनेक निराधार लोकांची मदत केली होती. त्यांच्यासोबत असे कसे होऊ शकते हे आम्हाला अद्याप समजले नाही.

बातम्या आणखी आहेत...