आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या पाच मुलांची हत्या करणाऱ्या एका आईला बेल्जियममध्ये इच्छामरण देण्यात आले आहे. 28 फेब्रुवारी 2007 रोजी म्हणजे तब्बल 16 वर्षांपूर्वी, जिनिव्ह हर्मित नावाच्या महिलेने स्वयंपाक घरातील चाकूने पाच मुलांचा गळा चिरून हत्या केली. यात एक मुलगा व 4 मुलींचा समावेश होता. हत्येनंतर जिनिव्हाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण यातून ती वाचली होती.
जिनिव्ह हरमिटचा मानसोपचारतज्ज्ञाने सांगितले की, तिने आपल्या मुलांच्या हत्येची तारीख 28 फेब्रुवारीलाच स्वतःचा मृत्यू मागितला होता. यातून तिला आपल्या मुलांना मारल्याचा पश्चताप व्यक्त करायचा होता. तिला इच्छामृत्यू दिल्यानंतर बुधवारी जिनिव्हवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलांना मारण्यासाठी सुपरमार्केटमधून चाकू चोरला
'डेलीमेल' मधील वृत्तानुसार, जिनिव्हाने आपल्या मुलांना मारण्यासाठी सुपरमार्केटमधून चाकू चोरला होता. कोर्टात सुनावणीदरम्यान तिने हे वास्तव्य सांगितले होते. ती कोर्टात म्हणाली होती की, तिला गुदमरल्यासारखे वाटत होते. मुलांसह तीची त्या घरात अडकली होती. हर्मितने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, मी माझ्या पतीला एक मुलगा दिला आणि नंतर त्याला मारून देखील टाकले. माझ्या चुकीमुळे मी माझी मुले गमावली आहेत. त्यांच्यासोबत असे व्हायला नको होते.
मुलांची हत्या केल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञाकडे 25 कोटींची मागणी केली
2007 मध्ये मुलांची हत्या केल्यानंतर हर्मितला 2008 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. खटल्यादरम्यान, शिक्षेच्या विरोधात, तिच्या वकिलाने दावा केला होता की, ते मानसिक आजारी आहे. त्यामुळे तिला तुरूंगात पाठवू नये. त्यामुळे न्यायधीशांनी मान्य केले की, तिने तिच्या मुलांच्या हत्येचा प्लॅन केला होता. तो अंमलात आणला त्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहीजे.
2019 मध्ये त्यांना उपचारासाठी मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान हर्मितने मानसोपचार तज्ज्ञाकडे 25 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. तिच्या वकिलाने दावा केला की, तिच्या मुलांची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. जे प्रभावी ठरले नाही. त्यामुळे तिने स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि ही हत्या केली.
2022 मध्ये बेल्जियममध्ये 2966 लोकांना इच्छामरण झाले
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये बेल्जियममध्ये 2966 लोकांना इच्छामरण देण्यात आले. जे 2021 च्या तुलनेत 10% जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार, कॅन्सरने पीडित बहुतेक लोक इच्छामरणाची मागणी करतात. याशिवाय बेल्जियममध्ये अशा लोकांनाही मृत्यू दिला जातो, ज्यांनी मानसिक आजारांमुळे जगण्याची इच्छा पूर्णपणे सोडून दिली आहे. 2014 मध्ये मुलांना इच्छामरणाचा अधिकारही देण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.