आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा लॉकडाऊन !:बेल्जियम 45 दिवसांसाठी लॉक, ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची तयारी सुरू; थंडीत 85 हजार मृत्यूंचा तज्ज्ञांचा इशारा

लंडन /पॅरिस /ब्रुसेल्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समध्ये गुरुवारी लॉकडाऊनची घोषणा होताच ७०० किमीचा वाहतुकीचा जाम लागला होता.
  • चिंता : अमेरिकेत विक्रमी 98 हजार रुग्ण आढळले

युराेपात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. बेल्जियममध्ये शनिवारी ४५ दिवसांचा राष्ट्रीय लाॅकडाऊन लावण्यात आला. त्याची अंमलबजावणी साेमवारपासून हाेईल. ताे १५ डिसेंबरपर्यंत चालेल. गेल्या आठवड्यात देशात दरराेज सरासरी १५ हजार रुग्ण आढळून आले हाेते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लाॅकडाऊनदरम्यान काेणत्याही घरात एकाहून जास्त पाहुण्यांना राहण्याची परवानगी नाही. पाहुणे आले असल्यास त्याची माहिती आराेग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहे. शाळांच्या परीक्षा १५ नाेव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वर्क फ्राॅम हाेम केले जाणार आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. दुसरीकडे ब्रिटनमध्ये काेराेनाचा संसर्ग वाढल्याने राष्ट्रीय पातळीवर लाॅकडाऊन लावण्याची तयारी सुरू झाली आहे. पुढील आठवड्यापासून येथे लाॅकडाऊन लागू केला जाऊ शकताे. थंडी वाढत असल्याने ब्रिटनमध्ये ८४ हजारांवर लाेकांना प्राण गमवावे लागू शकतात, असा इशारा संशाेधकांनी दिला आहे.

चिंता : अमेरिकेत विक्रमी 98 हजार रुग्ण आढळले
जागतिक महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. येथे काेराेनामुळे आतापर्यंत एकूण ९१ लाख रुग्ण समाेर आले आहेत तर २.३० लाख लाेकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. यादरम्यान शनिवारी विक्रमी ९८ हजार रुग्ण समाेर आले आहेत. अमेरिकेत ३ नाेव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक असतानाच देशात रुग्णसंख्या कमालीची वाढल्याचे दिसते. त्यामुळे अमेरिकींची चिंता वाढली.

प्रयत्न : युराेप रुग्णांना परस्पर देशांत हलवण्यासाठी अनुकूल
युराेपात रुग्णांची स्थिती पाहून त्यांना परस्पर देशांतील रुग्णालयांत हलवले जाऊ शकते. याबाबत युराेपीय देशांत एक करार झाला आहे. फ्रान्स व जर्मनीव्यतिरिक्त स्पेनमध्येही वाढती नवी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळे सरकार अधिक दक्ष झाले आहे. रुग्णांना युराेपातील देशांत हलवणे कठीण जाणार नाही. कारण बहुतांश देश लहान आहेत. सीमाही खुल्या आहेत.