आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव:कोरोना चाचणीचे निकाल दोन दिवसांत आले तरच फायदा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या बऱ्याच भागांत चाचणी, निकाल खूप दिवसांनी मिळत आहेत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने जगात सर्वाधिक परिणाम झालेल्या अमेरिकेमध्ये यांच्या चाचणीचे निकाल खूप उशिरा येत आहे. एका विद्यार्थ्याला फ्लोरिडामध्ये ११ दिवस आणि दुसऱ्याला २१ दिवस प्रतीक्षा करावी लागली. देशातील बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. लोक सोशल मीडियावर उशिरा निकालाची माहिती देत आहेत. संक्रमण रोखण्यासाठी चाचणी आवश्यक आहे. जुलैमध्ये अभ्यासानुसार आढळले की, चाचणीचा निकाल एक-दोन दिवसात मिळाला तरच उपयोगी पडेल. आरोग्य आणि मानवसेवा विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की केवळ ४५% प्रयोगशाळांच्या चाचण्यांचा निकाल तीन किंवा त्यापेक्षा कमी दिवसांत अाला आहे.

टाइम मासिकाच्या विश्लेषणावरून, यूएसमध्ये केवळ भौगोलिक अंतरामुळे नाही तर प्रयोगशाळा आणि तपास यंत्रणेतील भोंगळपणाने निकालास उशीर होत आहेत. स्वॅब, केमिकल, प्रशिक्षित लॅब कामगार आणि टेस्टिंग मशीनची कमतरता आहे. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी राज्यांना आवश्यक संसाधने पुरवते. पण, आता राष्ट्रीय पातळीवर हा साठा कमी झाला आहे. यूएसमध्ये प्रयोगशाळांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटचे प्राध्यापक नादा सँडर्स म्हणतात की अमेरिकेतील टेस्टिंग सिस्टम राष्ट्रीय एजन्सीविना अस्ताव्यस्त राहील. दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चाचण्या कमी झाल्या आहेत.