आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरूवारी अमेरिकन खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. जेरुसलेम येथील पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी नेतान्याहू यांना इराणवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, एकटा इराण 50 उत्तर कोरियाच्या बरोबरीचा आहे. उत्तर कोरीया फक्त शेजारीच तुम्हाला त्रास देतो असे नाही. उलट ते इस्त्रायला छोटा सैताना आणि अमेरिकनला मोठा सैतान मानतात. नेतन्याहू यांनी इराणची अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता आणि त्यामुळे अमेरिकेला असलेला धोका याबद्दल सांगितले.
अमेरिकन खासदाराची राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीका
डिसेंबर 2022 मध्ये, 74 वर्षीय बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये 37 व्यांदा सरकार स्थापन केले. यानंतर त्यांच्या पक्षाने स्वतःला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी विधेयक आणले. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अधिकार कमी करण्याचे सुचवण्यात आले आहे. याबाबत अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. अशा स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अद्याप त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिलेले नाही.
रिपब्लिकन पक्षाचे खासदार आणि वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांनी यावरून बायडेन यांच्यावर टीका केली. इस्रायलच्या दौऱ्यावर ते म्हणाले- परंपरेनुसार, बायडेन यांनी अद्याप नेतन्याहू यांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिलेले नाही. त्यांनी तसे न केल्यास मी स्वतः नेतन्याहू यांना अमेरिकेत बोलावीन.
इराणकडे 5 अणुबॉम्ब बनवण्याचे साहित्य, इस्त्रायचा आरोप
इराणने अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता वाढवल्याचा आरोप इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. ते म्हणाले की, इराण अण्वस्त्र बनवून खूश होणार नाही. त्याने 5 अण्वस्त्रे बनवण्यासाठी 60% सामग्री गोळा केली आहे. तो 90% झाला तर संपूर्ण परिसरात अशांतता पसरेल.
किंबहुना जगात अण्वस्त्रे मिळवण्याची शर्यत थांबवण्यासाठी अमेरिका आणि पाश्चात्य देश निर्बंधांचा अवलंब करत आहेत. या अंतर्गत त्यांनी इराण आणि उत्तर कोरियासह अनेक देशांवर आर्थिक आणि इतर निर्बंध लादले आहेत. इस्रायल 1966 मध्ये अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले. आता ही शस्त्रे बनवण्यास इराण सक्षम होऊ नये असे त्याला वाटते.
इराणला अण्वस्त्रे तयार करण्यापासून रोखण्यासाठी 2015 मध्ये एक करार झाला होता. त्यात इराण, ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश होता. या करारात असे ठरले होते की इराण वेळोवेळी त्याच्या अणुभट्ट्यांची संयुक्त राष्ट्रांकडून तपासणी करून घेईल आणि तो आपला अणुकार्यक्रम पुढे नेणार नाही. तथापि, 2018 मध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला करारातून बाहेर काढले. परिणामी इराणवर पुन्हा निर्बंध लादण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.