आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Benjamin Netanyahu's Victory In Israel Elections, PM Modi Congratulations To Friend, Possibility Of Free Trade Agreement With India Soon

इस्रायल निवडणुकीत बेंजामिन नेतन्याहू यांचा विजय:PM मोदी म्हणाले- मित्राचे अभिनंदन; लवकरच भारतासह फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंटची शक्यता

तेल अवीव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पुढील पंतप्रधान असतील. 'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, ते बहुमताने सत्तेत परतले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीच्या अंतिम फेरीत नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने 120 पैकी 64 जागा जिंकल्या. त्यांना सत्तेवर येण्यासाठी 61 जागांची गरज होती. इस्रायलमध्ये गेल्या 3 वर्षांत पाचव्यांदा निवडणुका झाल्या आहेत, यानंतर एक पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत परतला आहे.

73 वर्षीय बेंजामिन नेतन्याहू 1996 ते 1999 आणि 2009 ते 2021 अशी 15 वर्षे इस्रायलचे पंतप्रधान राहिले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नेतन्याहू 15 नोव्हेंबरनंतर औपचारिकपणे पंतप्रधान म्हणून नियुक्त होतील. दरम्यान, इस्रायल स्टेट प्रोटोकॉलनुसार राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग नेतन्याहू यांना सरकार स्थापन करण्यासाठी वेळ देतील.

पंतप्रधान मोदींचे खास मित्र आहेत नेतान्याहू

नेतन्याहू यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले- ‘माझे मित्र’ नेतन्याहू यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. आम्ही एकत्रितपणे भारत-इस्रायल सामरिक भागीदारी पुढे नेऊ.

नेतान्याहू पंतप्रधान म्हणून 5 वर्षांपूर्वी भारतात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. त्याच वर्षी ते इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होते. दोघांनी एकमेकांना मित्र म्हटले आहे. आता नेतान्याहू पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवाद, तंत्रज्ञान आणि व्यापारावर एकत्र काम करू शकतील. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारही होऊ शकतो.

लॅपिड यांनी केले नेतन्याहू यांचे अभिनंदन

मतमोजणीनंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पंतप्रधान यायर लॅपिड यांनी पराभव मान्य केला. त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळवता आल्या. बेंजामिन नेतन्याहू यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, त्यांनी सर्व विभागांना सत्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पराभव स्वीकारल्यानंतर येर लॅपिड म्हणाले – इस्रायल आणि तेथील नागरिक कोणत्याही राजकारणाच्या वर आहेत. विजयाबद्दल मी नेतन्याहू यांचे अभिनंदन करतो.
पराभव स्वीकारल्यानंतर येर लॅपिड म्हणाले – इस्रायल आणि तेथील नागरिक कोणत्याही राजकारणाच्या वर आहेत. विजयाबद्दल मी नेतन्याहू यांचे अभिनंदन करतो.

नेतान्याहू यांच्या आघाडीत केवळ 8 महिला

नेतन्याहू गटात केवळ 8 महिला आहेत, कारण अल्ट्रा-कन्झर्व्हेटिव्ह पक्ष महिलांना तिकीट देत नाहीत. लॅपिडच्या सरकारमध्ये 30 महिला होत्या. 30 वर्षांतील ही पहिली नेसेट असेल ज्यात अल्पसंख्याक ड्रूझ धर्माचा एकही प्रतिनिधी नसेल.

जूनमध्ये कोसळले बेनेट सरकार

जून 2021 मध्ये इस्रायलमध्ये सत्ताबदल झाला आणि नफ्ताली बेनेट यांना पंतप्रधान बनवण्यात आले. त्यांचे सरकार फार काळ टिकले नाही आणि इस्रायली संसद 30 जून 2022 रोजी विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून बेनेट सरकारमध्ये क्रमांक दोनवर असलेले नफ्ताली येर लॅपिड यांच्याकडे काळजीवाहूपदाची जबाबदारी होती, म्हणजेच ते काळजीवाहू पंतप्रधान होते.

टाइम्स ऑफ इस्रायलमधील वृत्तानुसार, बेनेट यांना नेतान्याहूंप्रमाणे युती कशी चालवायची हे माहिती नव्हते. याशिवाय कोट्यवधींना शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी देण्याचे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. यामुळेच त्यांना सत्ता गमवावी लागली.

दहशतवादाला आळा घालण्यासाठी नेतन्याहू पॅलेस्टिनी सीमा रोखणार

नेतन्याहू हे उघडपणे पॅलेस्टिनी विरोधी कट्टरवाद्यांसोबत आहेत. त्यांच्या विजयानंतर पॅलेस्टिनींना रोखण्यासाठी बांधलेल्या भिंतीचे काम पुढे जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्स पॉलिसी प्रभावीपणे राबविण्यासाठी भिंत आवश्यक आहे, असे नेतान्याहू यांचे मत आहे.

दुसरीकडे, पॅलेस्टिनी मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे की, इस्रायलच्या निवडणूक लोकशाहीचा एकच उद्देश आहे- पॅलेस्टिनी अरब लोकांना दाबणे आणि ज्यूंचे वर्चस्व निर्माण करणे.

पॅलेस्टिनी मानवाधिकार संघटना द इस्रायली इन्फॉर्मेशन सेंटर फॉर ह्युमन राइट्स इन ऑक्युपाइड टेरिटरीज, किंवा बेथसेलेमने निवडणुकीपूर्वी म्हटले की इस्रायली राजवट एकाच तत्त्वावर चालते- ज्यूंचा एक गट पॅलेस्टिनींच्या दुसर्‍या गटावर वर्चस्व गाजवतो. इस्रायलचे सरकार या लोकांच्या जीवनाचा निर्णय घेते, परंतु त्यांना निवडणुकीत भाग घेण्याचा किंवा मतदानाचा अधिकार नाही. पॅलेस्टिनी प्रदेशात राहणारे हे लोक पॅलेस्टाईनच्या प्रशासनाखाली राहतात. या भागांवर सध्या हमास आणि इतर अतिरेकी गटांचे नियंत्रण आहे.

बातम्या आणखी आहेत...