आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे स्पर्धा मार्चपासून बंद आहेत. सध्या हळूहळू स्पर्धेला सुरुवात होत आहे. यादरम्यान ई-स्पोर्ट््सबद्दल लोकांची अावड वाढली आहे. खेळावर पैसे लावणारे म्हणजे सट्टेबाजांनी ई-स्पोर्ट््सकडे आपले लक्ष्य वळवले. स्पोर्ट््स बुक पिनकलचे ट्रेंडिग संचालक मार्को ब्लूमने म्हटले की, “अमेरिकेत ई-स्पोर्ट््सवर सट्टेबाजी २०१० पासून सुरू झाली. तेव्हा आठवड्यात १०० डॉलर (जवळपास ७६०० रुपये) लावले जात होते. मी देखील खूप आनंदी होतो. जेव्हा मी आपल्या मंडळाला ई-स्पोर्ट््समधील सट्टेबाजी बाबत सांगितले, तेव्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि हसू लागले हाेते.’ कोरोनामुळे अर्धा ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास ५० हजार कोटी रुपये ग्लोबल गॅम्बल इंडस्ट्री ई-स्पोर्ट््सवर निर्भर झाली आहे. मार्चपासून बुक मेकर्सच्या ई-स्पोर्ट््सवर बेटिंग ४० टक्क्यांनी वाढली आहे.
पुढील ५-१० वर्षांत आणखी वेगाने वाढण्याचे चित्र
{कॅसिनो व्यवस्थापन कंपनी फिफ्थ स्ट्रीट गेमिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नेवादा ई स्पोर्ट््स अलायन्सचे संस्थापक सेठ शोएरने म्हटले की, “उत्तर अमेरिकेत पुढील ५ ते १० वर्षांत ई-स्पोर्ट््स सट्टेबाजीच्या बाबतीत एनएफएल व एनबीएनंतर तिसऱ्या स्थानी येईल.’ कोरोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती बिघडली आहे. प्रिंसेटन पब्लिक अफेअर्स ग्रुपचे बिल पास्करेलने म्हटले की, “तीन-चार राज्य या वर्षी ऑनलाइन स्पोर्ट््स सट्टेबाजीला परवानगी देतील, अशी अाशा होती. आता हे सर्व काही दुप्पट होऊ शकते.’
अमेरिकेमध्ये २०१८ मध्ये सट्टेबाजीला अधिकृत मान्यता
अमेरिकन न्यायालयाने २०१८ मध्ये सट्टेबाजीला अधिकृत केल्याची घोषणा केली. नेवादा राज्यामध्ये १९४९ पासून सट्टेबाजी सुरू आहे. २०१६ मध्ये पहिली ई-स्पोर्ट््स सट्टेबाजी सुरू झाली. २०१७ मध्ये दोन आणखी स्पर्धेवर सट्टेबाजी सुरू केली. या वर्षी मार्चनंतर नेवादामध्ये १३ ई-स्पोर्ट््स लीगवर सट्टेबाजीसाठी परवानगी मिळाली. नेवादा गेमिंग कंट्रोल बोर्डचे प्रमुख जेम्स टेलरने म्हटले, “लोक सट्टा लावू इच्छितात. आमचे लायसन्स ग्राहकांना ही संधी देते. ई-स्पोर्ट््सचे वैशिष्ट्य म्हणजे, खेळाडू घरी बसून देखील सामना खेळू शकतो.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.