आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Beware! Students, The Next Test Will Be Taken By 'AI Teacher', Will Evaluate Accurately And Give Grades And Will Also Get Detailed Feedback On Mistakes; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:खबरदार! विद्यार्थ्यांनो, पुढील चाचणी ‘एआय टीचर’ घेणार, अचूकपणे मूल्यांकन करून ग्रेड देणार अन् चुकांवर सविस्तर फीडबॅकही मिळणार

कॅड मेट्जएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची ऑटोमेटेड सिस्टिम विद्यार्थ्याची छोटी चूकही पकडेल

या वर्षी मार्चमध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ‘कोड इन प्लेस’ ऑनलाइन प्रोग्राममध्ये १४८ देशांतील १२०० हून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच्या फंडामेंटलशी संलग्न या कोर्समध्ये स्वीडनचा २३ वर्षीय फिलिप्स पामही सहभागी होता. चार आठवड्यांनंतर पाम याने पहिली चाचणी दिली. यात त्याने असा प्रोग्राम तयार केला ज्यात ब्लॅक अँड व्हाइट ग्रीडमध्ये ब्ल्यू डायमंडची वेव्ह होती. काही दिवसांनंतर त्याला निकाल मिळाला. यात पामच्या कामाचे कौतुक तर झालेच, शिवाय पामने एक छोटी चूक केल्याचेही सांगितले गेले. ही चूक म्हणजे तिसरे वेव्ह ओढताना ते भिंतीला धडकत आहे.

पामला हा फीडबॅक कोण्या शिक्षकाकडून नव्हे तर एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रोग्रामने दिला होता. पामप्रमाणेच हजारो विद्यार्थ्यांना असा फीडबॅक मिळाला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची ही सिस्टिम ई-एज्युकेशनच्या नव्या भविष्याचे संकेत देत असून ती सहजपणे हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. एआय संशोधक प्रा. चेल्सी फिन म्हणाल्या की, ही सिस्टिम अपेक्षेपेक्षा चांगले काम करत आहे.

यात १६०० फीडबॅक दिले असून ९७.९ % वर विद्यार्थ्यांनीही त्यावर सहमती दर्शवली आहे. मागील काही वर्षांत ह्यूमन इन्स्ट्रक्टरच्या फीडबॅकबाबत ९६.७% सहमती होती. तज्ज्ञांच्या मते महामारीत टेक्नॉलॉजीमुळे शिक्षणात क्रांतिकारी बदल झाले आहेत. एआय त्यात आणखीही सुधारणा करत आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळी पद्धत
शिक्षक वर्गात एकच विषय वेगवेगळ्या ३५ पद्धतीनुसार शिकवू शकत नाहीत. परंतु एआयद्वारे हे शक्य आहे. एआय प्रत्येक विद्यार्थ्याच्या वागणुकीचा अभ्यास करते. नंतर या माहितीआधारे विद्यार्थ्याचा शिकण्याचा अनुभव पर्सनालाइझ्ड करते. विद्यार्थी एखाद्या बेसिक कन्सेप्टमध्ये कमकुवत असेल तर एआय त्याला या कन्सेप्टशी संबंधित व्हिडिओ आणि रीडिंग मटेरियल वारंवार पाठवून ती संकल्पना पक्की करण्यास मदत करते.

विद्यार्थ्यांकडून वारंवार होणाऱ्या चुका ओळखण्यास एआयची मदत
स्टॅनफोर्डच्या या ऑनलाइन प्रोग्रामचे मॉनिटरिंग करत असलेले प्रा. क्रिस पाइच म्हणाले की, ह्युमन इन्स्ट्रक्टर पोहोचू शकत नाहीत, अशा हजारो विद्यार्थ्यांपर्यंत एआय सिस्टीमद्वारे पोहोचता येते. ती चुकाही शोधून त्यांच्या अडचणी सांगते. कोडिंगसंबंधीच्या विशिष्ट चुका आणि वारंवार होणाऱ्या चुका शोधून प्रशिक्षकांना कोणत्या विद्यार्थ्याला कशाची गरज आहे, हे चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यात मदत करते. या तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्टपणे निश्चित केली गेल्यानेच ते अत्यंत प्रभावी ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...