आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bezos, Musk And Buffett, Who Earn Billions, Pay The Lowest Income Taxes; Sometimes He Didn't Even Pay On Time; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:अब्जावधी रुपये कमावणारे बेजोस, मस्क आणि बफे भरतात सर्वात कमी आयकर; काही वेळा तर तोही वेळेवर नाही भरला

वॉशिंग्टन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रोपब्लिकाने अमेरिकी टॅक्स एजन्सी आयआरएसच्या आकड्यांचे केले विश्लेषण

जगातील आघाडीच्या श्रीमंतांमध्ये सहभागी असलेल्या जेफ बेजोस, इलाॅन मस्क, मायकल ब्लूमबर्ग आणि वॉरेन बफेंसह अमेरिकेतील २५ श्रीमंत व्यक्ती जुजबी आयकर भरत आहेत. न्यूज ऑर्गेनायझेशन प्रोपब्लिकाच्या अहवालानुसार काही वर्षांत तर या लोकांनी कर भरलेलाच नाही. एका अहवालानुसार सन २०१४ ते २०१८ दरम्यान अमेरिकेतील प्रमुख २५ अब्जाधीशांनी अत्यंत कमी कर भरला आहे.

अमेरिकी टॅक्स एजन्सी इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस (आयआरएस) च्या दस्तऐवजांनुसार वरील कालावधीत या श्रीमंतांची कमाई २९.२६ लाख कोटी रुपये होती. मात्र त्यांनी आयकराच्या रूपात केवळ ९९ कोटी रुपये दिले. उदाहरण द्यायचे तर अॅमेझॉनचे सीईओ बेजोस यांनी करच भरला नाही. त्या वर्षी त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत दुप्पट होती. २०११ मध्ये त्यांची संपत्ती ८६ हजार कोटी होती. परंतु त्यांनी तोटा दाखवून मुलांच्या नावावर दोन लाख रुपयांचे टॅक्स क्रेडिट घेतले होते.

प्रोपब्लिकानेे फोर्ब्जच्या आकड्यांवर हा अहवाल बनवला आहे. यात म्हटले की, या श्रीमंतांनी अमेरिकेच्या कर प्रणालीतील त्रुटींचा लाभ घेतला आहे. आम्ही जे कमावतो ते अमेरिकेत करपात्र ठरत नाही, असे त्यांनी दर्शवले आहे. त्यांची कमाई कंपन्यांचे शेअर, व्हॅकेशन होम्स, यॉट आणि इतर गुंतवणुकीवर होते जे की करपात्र उत्पन्न नाही. हे विकून त्यावर नफा कमावला गेला तरच त्यावर कर लावता येईल. याशिवाय कर नियमांमध्येही अनेक त्रुटी असल्याने करभरणा मर्यादित स्वरूपात येतो किंवा तो संपुष्टात येतो. करप्रणालीत सुधारणा करण्याचे काम करीत असलेल्या डेमोक्रॅटच्या खासदार एलिझाबेथ वॉरेन यांनी सांगितले की, अब्जाधीशांना लाभ देण्यासाठी आमच्या यंत्रणेत मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आली आहे.

या अब्जाधीश त्रिकुटांची एकूण संपत्ती ३४ लाख कोटी, तरी कर भरण्यात हयगय
बेजोससह टेस्लाचे मस्क यांनी २०१८ मध्ये कर भरला नाही. २०१४ ते २०१८ दरम्यान त्यांची संपत्ती १.०८ लाख कोटी रुपयांनी वाढली. मात्र कर ३ हजार कोटी भरला. बर्कशायर हॅथवेचेे सीईओ बफे यांनी याच काळात १७३ कोटी रुपये कर भरला. या काळात त्यांची संपत्ती १.७७ लाख कोटींनी वाढली. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार या तिघांची एकूण संपत्ती ३४ लाख कोटी रुपये आहे.

वॉरेन बफे
7.95 लाख कोटी
इलाॅन मस्क
12.18 लाख कोटी
जेफ बेजोस
संपत्ती 13.86 लाख कोटी

बातम्या आणखी आहेत...