आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bezos Will Be The First Billionaire To Go Into Space, A Dream He Has Been Dreaming Of Since The Age Of Five

स्पेस ट्रॅव्हल:जुलै महिन्यात अंतराळाच्या प्रवासावर जाणार अब्जाधीश जेफ बेजोस, पाचव्या वर्षापासून पाहताहेत स्वप्न

डेरिक ब्रायसन टेलर| टेक्सास12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेजोसची कंपनी ब्ल्यू ओरिजिन 20 जुलैला लाँच करेल रॉकेट

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व अॅमेझॉनचे संस्थापक जेफ व त्यांचे भाऊ मार्क बेजोस अंतराळाच्या यात्रेवर जातील. बेजोस यांनी सोमवारी घोषणा केली की, त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिन पुढील महिन्यात पहिले मानव अंतराळ उड्डाण पाठवेल तेव्हा तेही त्यात सामील असतील.

अॅमेझॉन सीईओ पद सोडल्यानंतर १५ दिवसांनंतरच बेजोस अंतराळासाठी रवाना होतील. बेजोस यांनी सांगितले, वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी अंतराळ प्रवासाचे स्वप्न बघत आलो आहे. २० जुलैला जिवलग मित्रासोबत (भाऊ) मी एका नव्या साहसावर निघेन. बेजोस अंतराळात जाणारे पहिले अब्जाधीश असतील.

टेस्लाचे संस्थापक एलन मस्क अंतराळ व मंगळावर जाण्याचे बाेलत असतात, मात्र आता बेजोस तो विक्रम आपल्या नावावर करत आहेत. ब्ल्यू ओरिजिनच्या रॉकेटमध्ये प्रवास करणाऱ्यांना ४ दिवसांचा अंतराळ प्रवासाचा अनुभव मिळेल. यात ३ दिवसांची प्री- फ्लाइट ट्रेनिंगही आहे. हे प्रशिक्षण कंपनीची लाँच साइट टेक्सासच्या वेन हॉर्नमध्ये दिले जाईल.

बेजोस यांची कंपनी ब्ल्यू ओरिजिन २००० मध्ये सुरू झाली होती. त्यात ३५०० कर्मचारी आहेत. या कंपनीची स्पर्धा एलन मस्क यांच्या स्पेसएक्सशी आहे. मे २०२० मध्ये स्पेसएक्स आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रापर्यंत मानवाला पोहोचवणारी पहिली खासगी कंपनी झाली आहे.

फ्लाइटच्या एका जागेचा लिलाव; ११ मिनिटांचा प्रवास
ब्ल्यू ओरिजिन त्यांच्या पहिल्या अंतराळ उड्डाणातील एका जागेचा लिलाव करेल. यातून मिळालेली रक्कम गणित व विज्ञान शिक्षणाला चालना देणाऱ्या ब्ल्यू ओरिजिनच्या फाउंडेशनला दिली जाईल. उड्डाणाचा एकूण प्रवास ११ मिनिटांचा असेल. यावेळी फ्लाइट १०० किलोमीटर (६२ मैल) उंचीवर प्रवास करेल.

बातम्या आणखी आहेत...