आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bhavishyavani For 2023; Wireless War | Nostredemus | Baba Venga | Paul Fairey | All You Need To Know

वायरलेस युद्ध, कॅन्सरचा खात्मा...:भविष्याच्या पोटात काय?; 100 वर्षांपूर्वी 2023 साठी वर्तवण्यात आलेली रंजक भविष्यवाणी वाचा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवे वर्ष उजडून 2 दिवस लोटलेत. भविष्याच्या पोटात काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नास्त्रेदमस व बाबा वेंगा यांची भविष्यवाणी वाचून जग आजही थक्क होते. या दोघांची भविष्यवाणी काही बाबतीत खरी ठरल्याचेही मानले जाते. पण या दोघांशिवायही अनेकांनी 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1923 साली 2023 साठी काही खास भविष्यवाणी केल्या आहेत. या भविष्यवाणी पॉल फेयरी यांनी ट्विटरवर सामायिक केल्या आहेत. यातील काही भविष्यवाणी वस्तुस्थितीशी प्रासंगिक, तर काही निव्वळ स्वप्नवत वाटतात.

चला तर मग 1923 मध्ये 2023 साठी कोणत्या भविष्यवाणी करण्यात आल्या होत्या याचा आढावा घेऊया...

2023 मध्ये 4 तासांहून जास्त काम नाही

1923 मध्ये इलेक्ट्रिकल एक्सपर्ट डॉक्टर चार्ल्स स्टीनमेज यांनी 2023 मध्ये जग पूर्णतः बदलेल असे भाकित वर्तवले होते. ते म्हणाले होते - 2023 मध्ये जगात अमुलाग्र बदल होईल. कुणालाही एका दिवसात 4 तासांहून जास्त वेळ काम करावे लागणार नाही. हे सर्वकाही वीजेमुळे शक्य होईल. आता 2023 उजाडले आहे. आजही बहुतांश देशांत कामाचे तास 8 आहेत. काही देशांत नागरिकांना आठवड्यातील 3 किंवा 4 दिवस काम करण्यावर चर्चा सुरू आहे... ही गोष्ट वेगळी.

महिला दात काळे करतील, केस काढतील

1923 मध्ये सवाना न्यूजने म्हटले होते की, 2023 उजाडताना महिला आपले केस शेव्ह करण्यास सुरुवात करतील. एवढेच नाही तर पुरुष कर्ल्स घालतील. तर महिला स्टाइल म्हणून आपले दात काळे करतील.

गॅसोलिनच्या जागी रेडिओचा वापर

विमान तज्ज्ञ ग्लेन कर्टिस यांनी 1923 मध्ये अंदाज वर्तवला होता की, 2023 साली वाहनांत गॅसोलिनच्या जागी रेडियोचा वापर केला जाईल. एवढेच नाही तर आकाशात एका ठराविक मार्गांवर विमाने उड्डाण करतील. कर्टिस यांची ही भविष्यवाणी अर्धी खरी ठरली आहे.

ब्यूटी कॉन्टेस्ट संपुष्टात येतील

2023 मध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट अर्थात सौंदर्य स्पर्धा संपुष्टात येतील असे भविष्यही 100 वर्षांपूर्वी वर्तवण्यात आले होते. एका भविष्यवाणीनुसार, 2023 पर्यंत जगात एवढे सुंदर लोक असतील की त्यांच्यातील एका सुंदर व्यक्तीची निवड करण्याची गरजच भासणार नाही. असाच दावा बेबी कॉन्टेस्टसंदर्भातही करण्यात आला होता. ही भविष्यवाणी अजून खरी ठरली नाही.

2023 मध्ये कॅन्सरचा खात्मा

1923 ते 2023 पर्यंत अनेक आजार संपुष्टात येतील, असेही भविष्य वर्तवण्यात आले होते. यात कॅन्सर, क्षयरोग, इन्फॅटाइल पॅरालिसिस (अर्धांगवायू), लोकोमोटर अटॅक्सिया व लेप्रोसी (कुष्टरोग) आदींचा समावेश आहे.

माणसाचे सरासरी वय 100 वर्षे होईल

2023 पर्यंत मानवाचे सरासरी वय वाढून 100 वर्षे होईल, अशी भविष्यवाणीही 1023 मध्ये करण्यात आली होती. सध्या हे वय 70 ते 75 वर्षांदरम्यान आहे. 1923 ची भविष्यवाणीत काहीजण 150 किंवा 200 वर्षे जगतील, असेही नमूद करण्यात आले होते.

मानवाचे 300 वर्षांपर्यंत वय वाढू शकते

एका वैज्ञानिकाने 1923 मध्ये पुढील 100 वर्षांत माणसांचे सरासरी आयुर्मान 300 वर्षांपर्यंत पोहोचू शकते, असाही दावा केला होता.

किडनीला थंडीपासून वाचवण्यासाठी कव्हर घालणे सुरू होईल

1923 च्या एका भविष्यवाणीत 2023 मध्ये लोक आपल्या किडनी अर्थात मूत्रपिंडाला थंडीपासून वाचवण्यासाठी तिच्यावर कव्हर घालण्यास सुरुवात करतील असा दावा करण्यात आला होता. टी-पॉट उष्ण ठेवण्यासाठी जे केले जाते, अगदी तेच काम या बाबतीत होईल असे यात नमूद करण्यात आले होते.

अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी, कॅनडाची 10 कोटी होईल

2023 मध्ये अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटींवर पोहोचण्याची भविष्यवाणी 100 वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. हे भविष्य खरे ठरले आहे. सध्या अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटींहून जास्त आहे. 2023 मध्ये कॅनडाची लोकसंख्याही 10 कोटींवर पोहोचण्याचे भविष्य व्यक्त करण्यात आले होते. पण सध्या कॅनडात अवघ्या 4 कोटींच्या आसपास लोक राहतात.

लगदा, सिमेंटपासून भांडी बनवणार

1923 च्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये मानवाकडे भरपेट अन्न असेल. यासाठी लागणारी भांडी व अन्य सामग्री मुख्यतः लगदा व सिमेंटपासून तयार केले जाईल.

शिकागो ते हॅम्बर्ग केवळ 18 तासांत

100 वर्षांपूर्वी 2023 मध्ये जर्मनीच्या हॅम्बर्गहून अमेरिकेच्या शिकागोपर्यंतच्या विमान प्रवासासाठी 18 तास लागतील असे भविष्य वर्तवण्यात आले होते. आजच्या तारखेत या दोन शहरांतील विमान प्रवासासाठी अवघे 9 तास लागतात.

वृत्तपत्र संपुष्टात येतील

100 वर्षांपूर्वी 2023 साठी करण्यात आलेल्या भविष्यवाणीत वृत्तपत्र संपुष्टात येण्याचाही उल्लेख आहे. या भविष्यवाणीनुसार, 1973 पर्यंत वृत्तपत्राचा काळ संपणार होता.

वायरलेस युद्ध, घडीच्या आकाराचे टेलिफोन

2023 साठी 100 वर्षांपूर्वी इतरही अनेक अंदाज व्यक्त करण्यात आले होते. 2023 पर्यंत प्रायव्हेट किचन संपतील. भविष्यातील अन्न रासायनिक सूत्रांपासून बनवले जाईल. टपाल व्यवस्था 2023 मध्ये संपेल. मालवाहक एका तासात 1,000 किलोमीटरचे अंतर कापून सायंकाळपूर्वी सामानाची डिलिव्हरी करतील. लोक घड्याळाच्या आकाराच्या टेलिफोनद्वारे बोलतील, अशा अनेक भविष्यवाणींचा यात समावेश होता. प्रोफेसर ए एम लो यांनी 2023 च्या आसपास वायरलेस युद्ध होतील, असे भाकितही वर्तवले होते.

बातम्या आणखी आहेत...