आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय-अमेरिकी भव्या लाल यांना अमेरिकी स्पेस एजेंसी NASA चे अॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ म्हणजेच कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना अवकाश एजन्सीमध्ये काही बदल आणि पुनरावलोकने करायची आहेत. म्हणूनच त्यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी भव्या यांच्यावर दिली आहे. भव्या मुळात अंतराळ वैज्ञानिक आहे. त्या बायडेन यांच्या ट्रांजिशन टीममध्येही राहिल्या आहेत.
भव्या यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे
सोमवारी रात्री NASA ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'भव्या सर्व बाबतीत या पदासाठी पात्र आहेत. त्यांच्याकडे अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा अनुभव आहे. 2005 ते 2020 पर्यंत त्या साइंस एंड टेक्नोलॉजी पॉलिसी इंस्टीट्यूट (STPI)च्या डिफेंस एनालिसिस शाखेत सदस्य आणि संशोधक राहिल्या आहेत.
निवदेनात पुढे म्हटले आहे की - 'स्पेस टेक्नोलॉजी, स्पेस स्ट्रॅटेजी अँड पॉलिसीमध्ये चांगला अनुभव असण्यासोबतच त्यांनी व्हाइट हाउसमध्ये पॉलिसी आणि नॅशनल स्पेस काउंसिलमध्येही काम केले आहे. भव्या यांना डिपार्टमेंट ऑफ डिफेंस आणि स्पेस इंटेलिजेंस कम्युनिटीचीही माहिती आहे.'
यापूर्वीही भव्या यांनी नासाला सल्ला दिला आहे
भव्या यांनी सलग दोन वेळा नॅशनल ओसियानिक अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीला लीड केले आहे. नासामध्ये त्या यापूर्वी अॅडवायजरी काउंसिल मेंबर राहिल्या आहेत. स्पेस रिचर्सच्या प्रकरणात अमेरिकेची मोठी कंपनी C-STPS LLC मध्येही भव्या यांनी काम केले आहे. यानंतर त्या याच्या प्रेसिडेंटही राहिल्या आहेत. यानंतर त्यांना व्हाइट हाउसमध्येही स्पेस इंटेलिजेंस कमिटीचे मेंबर बनवण्यात आले होते.
अमेरिकी न्यूक्लियर सोसायटी आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीसंबंधीत दोन सरकारी कंपन्यांनी भव्या यांना अॅडवायजर म्हणून बोर्डात जागा दिली होती. एस्ट्रोनॉट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांच्या सांगण्यावरुन फेरबदल करण्यात आले होते. भव्या यांनी मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजीनियरिंग केली. यानंतर पब्लिक पॉलिसी अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.