आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:बायडेन-कमला पुनरुज्जीवित करतील ‘अमेरिकन ड्रीम’: प्रवासी भारतीयांना आशा

न्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहंमद अली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची, तर हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार
  • ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण आता रद्द होणार

जो बायडेन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. या स्थितीत हे दोघे सर्वांच्या विकासाचा ध्यास असलेले ‘अमेरिकन ड्रीम’ पुनरुज्जीवित करतील, अशी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांना आशा आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेली धोरणे अमेरिकेच्या विकासात बाधा आहेत. सर्वात घातक म्हणजे इमिग्रेशन धोरण. कारण, यामुळे शेकडो भारतीयांना फटका बसला आहे. शिवाय अमेरिकेचेही नुकसान झाले. बायडेन यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन कौटुंबिक व्हिसा धोरणाचे समर्थन करेल. पूर्वीच्या उच्च कौशल्य असलेल्या व कष्टकऱ्यांसाठी असलेल्या अस्थायी व्हिसा प्रणालीमध्येही सुधारणा होतील. नंतर ग्रीन कार्ड आणि व्हिसा नियमांचा फेरआढावा घेतला जाईल.

एहसान आलम अमेरिकेत इन्फोसिसमध्ये काम करण्यासाठी आले होते. नंतर ते दुसऱ्या अमेरिकी कंपनीत रुजू झाले. त्यांनी सांगितले, दरवर्षी एच-१ बी कार्यक्रमानुसार ८५ हजारहून अधिक प्रवासी नागरिकांना व्हिसा दिला जात होता. यात सुमारे ७५ टक्के भारतीय होते. ट्रम्प यांच्या धोरणामुळे या श्रेणीत अर्ज फेटाळण्याचा २०१५ मधील ४.३ टक्के दर २०१९ मध्ये तब्बल १५.२ टक्के झाला. २०१९ मध्ये २८.१ टक्के व्हिसा अर्ज फेटाळले गेले. ट्रम्प यांनी पब्लिक चार्ज नावाचा एक नियम लागू केला होता. यात सरकारी वैद्यकीय किंवा खाद्यान्नासाठी मदत घेतली तर ग्रीन कार्ड नागरिकत्व मिळणे कठीण होते. यावर बायडेन यांनी हमी दिली आहे की गरीब प्रवाशांशी हा भेदभाव नष्ट केला जाईल. न्यूजर्सीतील वकील श्वेता सिंह म्हणाल्या, ट्रम्प यांच्या धोरणामुळे देशात १० लाखांहून अधिक पदे रिक्त राहिली.

परंपरा मोडणार : शपथविधीपूर्वीच ट्रम्प सोडणार व्हाइट हाऊस

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करून मावळते राष्ट्राध्यक्ष त्यांना व्हाइट हाऊसमध्ये तसेच शपथविधीला कॅपिटल हिलला घेऊन जातात, ही अमेरिकेत परंपरा आहे. या शपथविधीला शक्यतो मावळते राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहतात. मात्र, ट्रम्प शपथविधी समारंभ होण्यापूर्वीच व्हाइट हाऊस सोडणार आहेत.

> शपथविधीवेळी हिंसाचाराची शक्यता पाहता २५ हजार सैनिक तैनात असतील.

> ७८ वर्षीय बायडेन अमेरिकेचे ४६वे आणि सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष असतील.

> कमला हॅरिस (५६) यांच्या रूपाने मूळ भारतीय वंशाची व्यक्ती उपराष्ट्राध्यक्ष.

> समारंभात भारतीय संस्कृतीची झलक... कोलम (रांगोळी) काढली जाईल.

> टीम बायडेनमध्ये भारतीय वंशाचे २० लोक. यात १३ महिला, दोन काश्मिरी.

बातम्या आणखी आहेत...