आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील नोकऱ्यांत भारतीयांचा वाढता टक्का पाहता राष्ट्रपती जो बायडेन यांनी २६० लाख कोटींची (३.५ ट्रिलियन डॉलर) महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. ‘बिल्ड बॅक बेटर’ नावाच्या या योजनेकडे अमेरिकेत दशकांनंतर शैक्षणिक क्षेत्रातील मोठे पाऊल म्हणून बघितले जात आहे. शिक्षणाच्या सुरुवातीपासून ते कॉलेजपर्यंतचा यात अंतर्भाव आहे. दोन-दाेन वर्षे प्री-स्कूल आणि कॉलेज शिक्षण मोफत देण्याचे वचन देण्यात आले आहे. बायडेन यांनी निवडणुकीदरम्यान अमेरिकी समाजात जनकल्याणाच्या अनेक योजनांची घोषणा केली होती. या योजनेत रोजगाराच्या संधी वाढवणे आणि कोरोना काळात लोकांना येत असलेल्या अडचणी सोडवण्याची तरतूदही यात केली आहे. अमेरिकेत आशियाई विशेषत: भारतीय आणि चिनी मुले आणि युवक अमेरिकी समुदायांपेक्षा खूप पुढे आहेत. या संपूर्ण योजनेत शिक्षणासोबतच बाल आणि महिला कल्याणाची बाजूही यात समाविष्ट करण्यात आली आहे. डेमोक्रेट्स ही योजना अमेरिकी संसदेत पारित करण्यास एकवटले आहेत.
ओबामा-ट्रम्प साशंक
- २०१६ मध्ये माजी राष्ट्रपती ओबामा म्हणाले होते- जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकींसमोर नोकरीसाठी भारतीय व चिनींचे आव्हान आहे.
अमेरिकेत भारतीयांचा दबदबा
- २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते- अमेरिका इतिहासात सर्वात मोठ्या नोकऱ्या सहन करत आहे. भारतीय आणि चिनी नोकऱ्या चोरत आहेत.
वर्ण-उत्पन्नावर शिक्षणाचा स्तर
अमेरिकेत वर्ण आणि उत्पन्नाच्या आधारावर शिक्षणाच्या स्तरात चढ-उतार बघायला मिळतो. कमी शिक्षित असल्याने अनेक समुदायातील कर्मचाऱ्यांना कमी उत्पन्न मिळते. अमेरिकेत दशकांपासून सुरू असलेला हा परिपाठ संपवण्यासाठी बिल्ड बॅक बेटर योजना आणली आहे. तज्ज्ञ जेसिका थॉम्पसन यांच्या मते कमी उत्पन्न गटातील कॉलेज विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल.
राेजगाराकडे परततील महिला, चाइल्ड केअरचीही तरतूद
कोरोनाकाळात अनेक महिला रोजगार सोडण्यास बाध्य झाल्या होत्या. आता अमेरिका सामान्य स्थितीत येत असून मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. महिलांना रोजगार देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी याच योजनेत चाइल्ड केअरचाही समावेश करण्यातआला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.